आज वाहन चालकांना मिळणार लस : मनपातर्फे विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:41 AM2021-04-08T00:41:19+5:302021-04-08T00:44:08+5:30
Drivers to get vaccine कोरोनाचा प्रकोप विचारात घेता सुपर स्प्रेडर ठरण्याचा धोका असलेले ऑटोरिक्षा चालक, सायकलरिक्षा चालक, ई-रिक्षा चालक, काळी-पिवळी टॅक्सी चालक, ओला-उबर यासारख्या कंपनीचे चालक व खासगी ट्रॅव्हल्स चालक आदींना शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय रुग्णालयात आाज ८ एप्रिलपासून लस दिली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रकोप विचारात घेता सुपर स्प्रेडर ठरण्याचा धोका असलेले ऑटोरिक्षा चालक, सायकलरिक्षा चालक, ई-रिक्षा चालक, काळी-पिवळी टॅक्सी चालक, ओला-उबर यासारख्या कंपनीचे चालक व खासगी ट्रॅव्हल्स चालक आदींना शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय रुग्णालयात आाज ८ एप्रिलपासून लस दिली जाणार आहे. विविध क्षेत्रातील नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
दर बुधवारी महिलांना लसीकरण
समाजात महिलांची टक्केवारी ५० टक्के आहे. त्यांनासुद्धा लसीकरण करणे गरजेचे आहे. मनपाद्वारे प्रत्येक बुधवारी महिलांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली जाईल. या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे हा आहे.
असे राहील लसीकरण
८ एप्रिल - ऑटो चालक, ई-रिक्षा चालक
१० एप्रिल - डिलिव्हरी व कुरियर बॉय
१२ एप्रिल - भाजी व दूध विक्रेते
१४ एप्रिल - मजूर व हेल्पर
१६ एप्रिल - मीडिया कर्मचारी, पत्रकार
१८ एप्रिल - ट्रेडर्स
२० एप्रिल - रेस्टाॅरंट, हॉटेल्स, व्यापारी
२२ एप्रिल - सेल्स व मार्केटिंग
२४ एप्रिल - हॉकर्स
२६ एप्रिल - बँक कर्मचारी
दर बुधवारी - महिला