महामार्ग पाेलिसांतर्फे वाहनचालकांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:56+5:302021-09-19T04:08:56+5:30
काेंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील खुर्सापार येथील पाेलीस मदत केंद्राच्यावतीने शुक्रवारी (दि. १७) दुपारी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...
काेंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील खुर्सापार येथील पाेलीस मदत केंद्राच्यावतीने शुक्रवारी (दि. १७) दुपारी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात नागरिकांना अपघात टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच वाहनचालकांचा गाैरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहायक पाेलीस निरीक्षक विक्रांत सगणे, दुर्गाप्रसाद पांडे, ब्रिजेश तिवारी, चमेलीचे सरपंच वाघाळे, दिलीप काळे, बापू रेवतकर, रमेश भिवगडे, गोपाल माकोडे, संदीप मने उपस्थित होते. हेडकॉन्स्टेबल राजेश पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट करीत रस्ते अपघात व अपघातातील जखमींना करण्यात आलेली मदत याचा आढावा घेतला. रुग्णवाहिकाचालक संजय गायकवाड यांनी त्यांचे अपघातातील जखमींना केलेल्या मदतीचे अनुभव सांगितले. सहायक पाेलीस निरीक्षक विक्रांत सगणे यांनी अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, अपघातातील जखमींना करावयाची मदत याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. अतिथींच्या हस्ते संजय गायकवाड यांच्यासह इतरांचा गाैरव करण्यात आला. यशस्वितेसाठी रामप्रसाद दुधबर्वे, जयश्री टेंभुर्णे, सुरेश डायरे, अमोल सोमकुवर, महेश वेरूडकर, चंद्रशेखर शेंदरे यांनी सहकार्य केले.