वाहनचालकांची कसून तपासणी हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:10 AM2020-12-31T04:10:20+5:302020-12-31T04:10:20+5:30
काेंढाळी : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिसांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग व अन्य माेठ्या मार्गावर नाकाबंदी करून वाहनचालकांची ...
काेंढाळी : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिसांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग व अन्य माेठ्या मार्गावर नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी माेहीम हाती घेतली आहे. यात प्रत्येक वाहनचालक दारू प्यायला आहे की नाही, याची कसून तपासणी केली जाणार असून, दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कठाेर कारवाई केली जाणार आहे.
काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ गेला असून, या महामार्गालगत हाॅटेल्स, रिसाेर्ट, धाबे व वाॅटर पार्कची संख्या बरीच माेठी आहे. ‘थर्टी फर्स्ट’निमित्त शहरी व ग्रामीण भागातील तरुण माेठ्या प्रमाणात पार्टी करण्यासाठी हाॅटेल्स, रिसाेर्ट व धाब्यांवर येतात. त्यातून अनुचित प्रकार घडण्याची व काेराेना संक्रमण वाढण्याची शक्यता बळावते. याला आळा घालण्यासाठी गुरुवारी (दि. ३१) या भागातील सर्व हाॅटेल्स, रिसाेर्ट, धाबे व वाॅटर पार्क रात्री ११ वाजता बंद करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. यात दारू पिऊन तसेच अति वेगात वाहने चालविणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल, अशी माहिती काेंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी दिली.