डीआरएस पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: December 20, 2015 11:51 PM2015-12-20T23:51:37+5:302015-12-20T23:51:37+5:30
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज उदारा जयसुंदेरा याला वादग्रस्त पद्धतीने
मालवण : महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांतील ७८५ स्पर्धकांचा सहभाग असलेली सहावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा रविवारी मालवणच्या चिवला बीच किनाऱ्यावर संपन्न झाली. यात नाशिक, नागपूर, कोल्हापूर व मुंबईच्या स्पर्धकांनी बाजी मारली. पाच कि.मी. स्पर्धेत ठाण्याच्या मयांक वैभव चाफेकर (२९ मिनिट ४७ सेकंद), व कोल्हापूरच्या निकिता शैलेश प्रभू (३१ मिनिट २ सेकंद) यांनी प्रथक क्रमांक पटकावीत वेगवान जलतरणपटूचा मानाचा किताब पटकाविला. सिंधुदुर्गच्या समर्थ मोरे यांनी एक कि.मी. प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला, तर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी स्पर्धेत सहभागी होत तीन कि.मी. प्रकारात पाचवा क्रमांक मिळविला आहे. दोनशेहून अधिक महिला-मुलींसह २२ अपंग जलतरणपटूंनी स्पर्धेतील सहभाग कौतुकास्पद राहिला.पाच कि.मी.,तीन कि.मी., दोन, एक कि.मी. व ५०० मीटर या अंतरात विविध अकरा गटांत सहा ते ८५ वयोगटातील या स्पर्धेस सकाळी सात वाजता नगराध्यक्षांनी झेंडा दाखविल्यानंतर सुरुवात झाली. महिला, मुलांसह अपंग व बुजुर्ग जलतरण पटू जिंकण्याच्या उद्देशाने अरबी समुद्रात झेपावले. स्पर्धकांची काळजी घेण्यासाठी त्यांना सूचना करण्यासाठी विविध पथके संघटनेचे नील लब्दे, स्कुबा डायव्हिंगचे रुपेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात तैनात होती. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सर्व गटांतील स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचा निकाल पाच कि.मी. : मुले - मयांक चाफेकर (ठाणे), प्रभात कोळी (मुंबई), ऋतुराज बिडकर (सोलापूर), मुली- निकिता प्रभू (कोल्हापूर), समृद्धी शेंदुरे (कोल्हापूर), भक्ती पाटील (कोल्हापूर), प्रज्ञा लाड (सातारा), समीक्षा शिंदे (ठाणे). मोठा गट - शरद पाटील (कोल्हापूर), निखिल बोडके (पुणे), श्रेयस मोहिते (पुणे), महिला - तेजश्री गायकवाड (सातारा), कार्तिका धर (मुंबई).
तीन कि.मी. : मुले - पवन कुमार (मुंबई), अमर पाटील (रायगड), संजय जाधव (सांगली). मुली- श्वेता म्हात्रे (मुंबई), सपना साखरकर (नागपूर), पौर्णिमा विवेक (ठाणे), उर्मिला गायकवाड (पुणे). मोठा गट - संदीप भोईर (रायगड), सुखविंदर सिंह (मुंबई), शंकर थापा (मुंबई). महिला - सुखाजित कौर (मुंबई), आरती डगा (मुंबई). दोन कि.मी. : मुले - कृष्णा गडखा (नाशिक), भरत मिस्वात (नागपूर), जरेश घाग (कोल्हापूर). मुली- हमानी फडके (नागपूर), अनन्या पांडे, मानसी शृंगारे (कोल्हापूर).
एक कि.मी. : समर्थ मोरे (सिंधुदुर्ग), अश्विन जयस्वाल (मुंबई), आदित्य हिप्परगी (सोलापूर). मुली - अनुष्का धत्र (नाशिक), मेहक सोहिल (नाशिक), आर्या मोहिते (नवी मुंबई). पाचशे मीटर : शार्दुल म्हात्रे (मुंबई), रोहन अंबुरे (ठाणे), कौस्तुभ भोसले (कोल्हापूर). मुली - राघवी रामानुजन (ठाणे), रुजुला कुलकर्णी (नाशिक), प्राची नाईक (नाशिक).
स्पर्धेदरम्यान खासदार विनायक राऊत यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी पाचशे मीटर स्पर्धेला त्यांनी झेंडा दाखविला.
स्पर्धेतील वेगवान जलतरणपटू
तीन किमी - नकुल भोयर (नागपूर), रश्मी त्रिंबके (नागपूर).
दोन किमी - कृष्णा गडख (नाशिक), हिमानी फडके (नागपूर).
एक किमी - समर्थ मोरे (सिंधुदुर्ग), अनुष्का धात्रक (नाशिक).
५०० मीटर - शार्दुल म्हात्रे (मुंबई), राघवी रामानुजन (ठाणे)