गरीब रुग्णांच्या मदतीसाठी औषध बँक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:19+5:302021-05-01T04:07:19+5:30

नागपूर : काेराेना महामारीच्या भीषण परिस्थितीत सामाजिक संघटना व संवेदनशील नागरिक मदतीसाठी कार्य करीत आहेत. असाच एक संवेदनशील उपक्रम ...

Drug Bank to help poor patients () | गरीब रुग्णांच्या मदतीसाठी औषध बँक ()

गरीब रुग्णांच्या मदतीसाठी औषध बँक ()

googlenewsNext

नागपूर : काेराेना महामारीच्या भीषण परिस्थितीत सामाजिक संघटना व संवेदनशील नागरिक मदतीसाठी कार्य करीत आहेत. असाच एक संवेदनशील उपक्रम नागपूर सिटीझन्स फाेरमच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. फाेरमतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘मेडिसीन बँके’च्या माध्यमातून शहरातील गरीब, गरजू रुग्णांना नि:शुल्क औषध वितरण करण्याचे कार्य तरुण सदस्यांनी सुरू केले आहे.

फाेरमचे सदस्य प्रतीक बैरागी यांनी सांगितले, काेराेना रुग्णांवर उपचार करताना दिली जाणारी औषधे महागडी आहेत. १४ दिवसांचे औषध विकत घेण्यासाठी तब्बल अडीच ते दहा हजारांपर्यंत खर्च येतो. आर्थिक अडचणींचा सामना करणारे अनेक जण महागडी औषधे घेण्याचे टाळतात. फोरमच्या सदस्यांनी याविषयी शहराच्या विविध वस्त्यांमध्ये एक छोटे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात पाॅझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक, मेडिकल स्टोर्स चालक व काही डाॅक्टरांशी संवाद साधला. फॅविपिरावीर नावाचे औषध न घेतल्यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावत असल्याचे या सर्वेक्षणात प्रामुख्याने आढळून आले. त्यामुळे फोरमने ‘दवा दान’ हा अनोखा उपक्रम सुरू केला. फोरमने शहरातील काेराेना आजारातून बरे झालेल्या नागरिकांकडून उरलेली औषधे दान रूपात बँकेत जमा करून ती गरीब व गरजू रुग्णांना मोफत पुरवली जातात. पाच लाभार्थी कुटुंबीयांना औषध किट देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांच्या औषधीचे वितरण केले जाणार आहे. यासाठी औषध किट तयार करण्यात आली आहेत. या किटमध्ये फेविपिरावीर, पॅरासिटामाॅल, आयवरमॅक्टिन, लिमची, एझिथ्रोमायसिन, डाॅक्सी, झिंक, डी ३ रिस्क, एलेक्स कफ सिरप या औषधांचा १४ दिवसांचा डोस, मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश आहे. अभिजित सिंह चंदेल, अभिजित झा, गजेंद्रसिंग लोहिया, अमित बांदूरकर व वैभव शिंदे पाटील आदी कार्यकर्ते या उपक्रमासाठी सक्रिय कार्य करीत आहेत. महानगरपालिकेच्या टेस्टिंग सेंटरवरील कोविड पाॅझिटिव्ह अहवाल, आधार कार्ड व डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन या आधारावर लाभार्थी निवडून त्यांच्या नातेवाइकांना या किट सोपवल्या जाणार असल्याचे बैरागी यांनी सांगितले.

Web Title: Drug Bank to help poor patients ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.