ड्रग स्मगलर आशी डे अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:04+5:302021-05-22T04:09:04+5:30

पोलिसांनी लावला छडा : पॉश एरियातून चालवत होती नेटवर्क लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य भारतातील प्रमुख पाच ड्रग ...

Drug smuggler Aashi De finally arrested | ड्रग स्मगलर आशी डे अखेर जेरबंद

ड्रग स्मगलर आशी डे अखेर जेरबंद

Next

पोलिसांनी लावला छडा : पॉश एरियातून चालवत होती नेटवर्क लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य भारतातील प्रमुख पाच ड्रग स्मगलर्स पैकी एक समजली जाणारी कुख्यात आशी डे हिच्या अखेर शुक्रवारी गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. इंद्रप्रस्थ नगरात एका पॉश सदनिकेतून गेल्या तीन महिन्यापासून ती अमली पदार्थाच्या तस्करीचा गोरखधंदा करीत होती.

उत्तर नागपुरातून अमली पदार्थाच्या तस्करीत उतरलेली आशी डे गेल्या वर्षभरात एक मोठी ड्रग सप्लायर म्हणून चर्चेला आली होती. ती आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून नागपूर आणि आजूबाजूच्या शहरात एमडी, चरसची तस्करी आणि विक्री करत होती. तिच्या नेटवर्कची माहिती सहा महिन्यांपूर्वी पोलिसांना मिळाली. मात्र, ती हाती लागत नव्हती. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी कुख्यात ड्रग सप्लायर सलमान खान याच्या मुसक्या बांधल्या. सलमान मूळचा उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्याचा रहिवासी होय. मुंबईतील मोठ्या ड्रग पेडलर्ससाठी तो काम करीत होता. नागपुरातही नियमित एमडी आणि चरसची खेप पोहोचवत होता. तो एका पायाने अपंग असल्यामुळे कृत्रिम पाय लावून त्यातून ड्रग तस्करी करायचा. त्यामुळे त्याच्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नव्हते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना सलमान खान नागपुरात नियमित एमडी आणि चरस घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी एनडीपीएस पथकाला सलमानवर नजर ठेवण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सलमान नागपुरात येताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आशी डे भोवती कारवाईचा पाश आवळला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी आशी पोलिसांच्या हाती लागली.

---

इंद्रप्रस्थ नगरात जमवला अड्डा

आशीने तीन महिन्यापूर्वी इंद्रप्रस्थ नगरातील (भामटी) साई अर्चना रेसिडेन्सीमध्ये आठ हजार रुपये महिन्याने बेंगलोरच्या राव नामक महिलेची सदनिका भाड्याने घेतली होती. येथे ती तिच्या वृद्ध आईसोबत राहू लागली. तिच्या हालचाली प्रचंड संशयास्पद होत्या, असे आता शेजारी सांगत आहेत. पोलीस तिला शनिवारी न्यायालयात हजर करून तिच्या कोठडीची मागणी करणार आहेत.

---

Web Title: Drug smuggler Aashi De finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.