दारू पिऊन वाहनचालक तर्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:35+5:302021-07-04T04:06:35+5:30

- कोरोनामुळे कारवाई शून्य - तोंडावर मास्क; पोटात मद्य - ब्रिथॲनलायझरचा वापर बंद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा ...

Drunk driving | दारू पिऊन वाहनचालक तर्राट

दारू पिऊन वाहनचालक तर्राट

Next

- कोरोनामुळे कारवाई शून्य

- तोंडावर मास्क; पोटात मद्य

- ब्रिथॲनलायझरचा वापर बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर अर्थात ड्रंक न ड्राइव्हच्या कारवाईचा हात आखडता घेतल्यामुळे अनेक वाहनचालक सैराट झाले आहेत. ते दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहने चालवत आहेत. यामुळे शहरातील अपघाताची संख्या वाढली असून, अनेकांना नाहक प्राण गमवावे लागत आहेत. तळीराम मद्यधुंद होऊन वाहन चालवितात त्यामुळे अपघाताचा धोका जास्त वाढतो. त्याची किंमत अनेक निष्पाप लोकांना भोगावी लागते. दोष नसताना अनेक जण जखमी होतात. त्यामुळे त्यांचा रोजगार जातो. त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना वैद्यकीय खर्चाचा भार सहन करावा लागतो आणि विनाकारण रुग्णालयात हेलपाटे घालावे लागतात. प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकांना अपंगत्व येते, तर काहींचे जीव जात असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आयुष्यभर सलणारी जखम होते.

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ड्रंक न ड्राइव्हची कारवाई केली जाते. त्यासाठी ब्रिथॲनलायझरचा पोलीस वापर करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई बंद केली. त्यामुळे तळीराम झोकात सुटले आहेत. ते तर्राट होऊन वाहने चालवत आहेत. त्यांना वठणीवर आणणे गरजेचे आहे. अन्यथा, अपघाताचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे.

---

मद्यपी वाहनचालकांवर झालेली

कारवाई

२०१९ : १९,९०६

२०२० : ५७२१

२०२१ : ००००

---

संसर्गाचा धोका लक्षात घेता

ब्रिथॲनलायझरचा वापर बंद करण्यात आला असला तरी मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा धडाका सुरू केला जाणार आहे.

- सारंग आवाड

पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, नागपूर

---

Web Title: Drunk driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.