मद्यधुंद कार चालकाची दुभाजकाला धडक, नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण पळून गेला

By नरेश डोंगरे | Updated: December 7, 2024 04:34 IST2024-12-07T04:33:03+5:302024-12-07T04:34:26+5:30

कारची मागची आणि पुढची नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण  पळून गेला.

Drunken car driver crashes into divider, | मद्यधुंद कार चालकाची दुभाजकाला धडक, नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण पळून गेला

मद्यधुंद कार चालकाची दुभाजकाला धडक, नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण पळून गेला

नागपूर : मध्यधुंद कार चालकाने त्याच्या ताब्यातील ईनोवा कार दुधात दुभाजकला धडकवली. आज मध्य रात्री साडेबाराच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. या कारमध्ये तरुण-तरुणी होत्या. मात्र अपघात झाल्यानंतर त्यांनी कारमधून बाहेर निघून घटनास्थळावरून पळ काढला.  विशेष म्हणजे कारची मागची आणि पुढची नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण  पळून गेला.

ही नवी कोरी इनोवा कार नेमकी कोणाची आहे आणि या कारमध्ये कोण होते, ते स्पष्ट झाले नाही. मात्र अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. कार चालक आणि आत मधील मंडळी बाहेर पळून गेल्यामुळे ती जखमी आहेत की नाही, हे सुद्धा स्पष्ट झाले नाही. मात्र अपघातात कारच्या समोरचा भाग तसेच डिव्हायडर तुटले. कार छत्रपती चौकातून नरेंद्रनगर कडे वेगात जात होती. अपघातानंतर कारचालकाने कारचा नंबर लक्षात येऊ नये म्हणून मागची आणि पुढची नंबर प्लेट तोडल्याचे घटनास्थळी जमलेली मंडळी सांगत होती.माहिती कळल्यानंतर रात्री एक वाजता बेलतरीडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास सुरू आहे

Web Title: Drunken car driver crashes into divider,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.