‘बाबा, माझं लगीन का करत नाही’ म्हणत दारुड्या मुलाची वडिलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 09:53 PM2023-05-10T21:53:46+5:302023-05-10T21:54:26+5:30

Nagpur News नागपुरातील एका दारूड्या मुलाने याहून पुढे जात लग्न करून देण्याची जिद्द करत चक्क स्वत:च्या जन्मदात्या वडिलांनाच मारहाण केली.

Drunken son beat his father saying 'Dad, why are you not logging in?' | ‘बाबा, माझं लगीन का करत नाही’ म्हणत दारुड्या मुलाची वडिलांना मारहाण

‘बाबा, माझं लगीन का करत नाही’ म्हणत दारुड्या मुलाची वडिलांना मारहाण

googlenewsNext

नागपूर : एका चित्रपटात गतिमंद मुलगा ‘बाबा लगीन’ असे म्हणत लग्न करून देण्याचा हट्ट करत वडिलांच्या मागे लागतो व भंडावून सोडतो, असे दाखविण्यात आले होते. मात्र नागपुरातील एका दारूड्या मुलाने याहून पुढे जात लग्न करून देण्याची जिद्द करत चक्क स्वत:च्या जन्मदात्या वडिलांनाच मारहाण केली. यावर कळस म्हणजे त्याने चक्क त्यांना जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. अखेर वडिलांनी मुलाविरोधातच पोलिसांकडे धाव घ्यावी लागली.

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून हा प्रकार ऐकून पोलीसदेखील चक्रावले. सुरेश मोतीराम टाकलीकर (टिमकी) असे ७० वर्षीय दुर्दैवी पित्याचे नाव आहे. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मोठा मुलगा सचिन (४०) हा एका हॉटेलमध्ये काम करतो व त्याला दारुचे व्यसन आहे. त्याच्या या व्यसनाबाबत शेजारी तसेच नातेवाईकांना माहिती असल्याने त्याचे अद्यापही लग्न झालेले नाही. त्याला कुणीच मुलगी द्यायला तयार होत नाही. यामुळे त्याची चिडचिड वाढली असून लहानसहान गोष्टींवरून तो घरात वाद घालतो.

दोन दिवसांअगोदर त्याने लग्नाचा विषय काढला व दारुच्या नशेत वाद घालायला सुरुवात केली. नेमक्या त्याच वेळी सुरेश हे बाहेरून घरी आले व सचिनने वडिलांनाच अद्वातद्वा बोलायला सुरुवात केली. तुम्ही माझ्यासाठी मुलीच शोधत नाही, असा आरोप लावत त्याने शिवीगाळ सुरू केली. वडील त्याला समजावत असतानाच त्याने लाकडी बॅट हातात घेतली व वडिलांवर हल्ला केला. त्याने बॅटने सुरेश यांच्या गुडघ्यावर व हातांवर वार केले. त्यात सुरेश यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला.

वडील पोलिसांत जाऊ शकतात याची सचिनला कल्पना होती. त्यामुळे जर पोलीस तक्रार केली तर ठार मारण्याचीदेखील धमकी दिली. या प्रकारामुळे सुरेश अक्षरश: हादरले व त्यांनी तहसील पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना तातडीने मेयो इस्पितळात दाखल केले. त्यांच्या तक्रारीवरून सचिनविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Drunken son beat his father saying 'Dad, why are you not logging in?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.