Maharashtra Election 2019; मतदान व मतमोजणी कालावधीत ‘ड्राय डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 10:58 AM2019-10-18T10:58:46+5:302019-10-18T10:59:14+5:30
नागपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने चार दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने चार दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
आदर्श आचारसंहिता कालावधीत मतदानाच्या ४८ तासांपूर्वी म्हणजे १९ ते प्रत्यक्ष मतदानादिनी २१ ऑक्टोबर दरम्यान आणि मतमोजणीच्या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात मद्यविक्री न करता कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचे निर्देश अनुज्ञप्तीधारकांना दिले आहेत. जिल्ह्यात सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी त्यांच्या निवडणूक क्षेत्रातील देशी व विदेशी तसेच इतर अनुज्ञपत्या मद्यविक्रीसाठी बंद ठेवाव्यात.