हिवाळी अधिवेशनात मंत्री व आमदारांच्या अनुपस्थितीवर उपसभापतींची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 08:02 PM2017-12-21T20:02:02+5:302017-12-21T20:03:41+5:30
संबंधित मंत्री व आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज १५ मिनीटांसाठी तहकूब केले. मात्र कामकाजाला सुरुवात होताच ठाकरे यांनी अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : संबंधित मंत्री व आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज १५ मिनीटांसाठी तहकूब केले. मात्र कामकाजाला सुरुवात होताच ठाकरे यांनी अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
कामकाजात १६ लक्षवेधींचा समावेश आहे. परंतु सभागृहात मंत्री व आमदार अनुपस्थित आहेत. संसदीय कामकाज मंत्रीही उशिरा आले. मंत्री येतील तेव्हाच सभागृहाचे कामकाज सुरू होईल. ही प्रथा योग्य नाही, अशी नाराजी ठाकरे यांनी व्यक्त केली.
१५ मिनिटानंतर मंत्री सभागृहात आले आहेत. भविष्यात असा प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. यापूर्वीही असा प्रकार झाल्याचे तावडे यांनी निदर्शनास आणले. शिवसेनेच्या डॉ. नीलम गोºहे यांनी तावडे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. यावर ठाकरे म्हणाले, गेल्या ५०-६० वर्षांत सभागृहात एकही मंत्री उपस्थित नाही,असा प्रकार घडलेला नाही.