नागपूर विभागात बंदमुळे एसटी महामंडळाला ३० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 09:17 PM2018-01-03T21:17:56+5:302018-01-03T21:20:46+5:30

बंदमुळे एसटी महामंडळाला आपल्या ५३९ बसफेऱ्या   रद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात ३० लाखांचा फटका बसला. बससेवा सुरू असताना आंदोलकांनी ३ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना कामठी, गंगाबाई घाट आणि वानाडोंगरी परिसरात घडल्या. बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांना बसस्थानकावर येऊन परत जाण्याची पाळी आली.

Due to Bandh Nagpur division, the ST corporation suffered a loss of Rs 30 lakh | नागपूर विभागात बंदमुळे एसटी महामंडळाला ३० लाखांचा फटका

नागपूर विभागात बंदमुळे एसटी महामंडळाला ३० लाखांचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देतीन बसेसची तोडफोड : ५३९ बसफेऱ्या  केल्या रद्द

आॅनलाईन लोकमत
नागपूर : बंदमुळे एसटी महामंडळाला आपल्या ५३९ बसफेऱ्या   रद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात ३० लाखांचा फटका बसला. बससेवा सुरू असताना आंदोलकांनी ३ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना कामठी, गंगाबाई घाट आणि वानाडोंगरी परिसरात घडल्या. बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांना बसस्थानकावर येऊन परत जाण्याची पाळी आली.
महाराष्ट्र बंद असल्यामुळे पोलिसांच्या संपर्कात राहूनच बससेवा सुरु ठेवण्याचे आदेश मुंबई मुख्यालयाने एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाला देण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ८ वाजेपर्यंत एसटी महामंडळाच्या फेºया नियमित सोडण्यात आल्या. नागपूर विभागात गणेशपेठ, घाट रोड, इमामवाडा, वर्धमाननगर, उमरेड, काटोल, रामटेक, सावनेर हे आठ डेपो आहेत. या आठही डेपोतून दिवसाकाठी ११४० बसफेऱ्या   सोडण्यात येतात. परंतु बंदमुळे यातील ६०१ फेऱ्याच आगाराच्या बाहेर गेल्या. ५३९ फेऱ्या   रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाला घ्यावा लागला. यात महामंडळाला विभागात ३० लाखाचा फटका बसल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी आगाराबाहेर गेलेल्या तीन बसेसची तोडफोड आंदोलकांनी केली. यात तुमसर आगाराची एम. एच. २०, डी-९३१९ ही बस गंगाबाई घाटाजवळ, घाट रोड आगाराची एम. एच. ४०, एन-८२०७ क्रमांकाची बस वानाडोंगरीच्या राजीवनगर भागात आणि ८१० क्रमांकाची बस कामठी येथे फोडण्यात आली. बसची तोडफोड झाल्यामुळे दुपारी एसटीने आपल्या बसेसची वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला. बंद असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेत आधीच रद्द केलेला होता. काही तुरळक प्रवाशी गणेशपेठ बसस्थानकावर आले होते. परंतु बसेस बंद असल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जाण्याची पाळी आली.

Web Title: Due to Bandh Nagpur division, the ST corporation suffered a loss of Rs 30 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.