नागपुरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:03 PM2019-06-13T22:03:48+5:302019-06-13T22:08:39+5:30
संत्रा मार्केट परिसरातील रेल्वे स्टेशन गेटच्या मागील बाजूला गुरुवारी मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना ३७५ मि.मी व्यासाची फोर्ट-५मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत्रा मार्केट परिसरातील रेल्वे स्टेशन गेटच्या मागील बाजूला गुरुवारी मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना ३७५ मि.मी व्यासाची फोर्ट-५मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनी फुटल्याने शुक्रवारी दुपारी ४ पर्यंत गांधीबाग झोनमधील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. यात बजेरिया, मारवाडी चाळ, भालदारपुरा, नातिक चौक, राममंदिर गल्ली, जुने हिस्लॉप कॉलेज आणि अत्तर गल्ली मागील भागांचा समावेश आहे.
महा मेट्रोच्या कंत्राटदामुळे नोव्हेंबर २०१६ पासून आजवर १३ वेळा जलवाहिनीचे नुकसान झाले. यामुळे ४९.४५ दशलक्ष लिटर पाण्याची नासाडी झाली. पाणीपुरवठा बाधित राहणाऱ्या भागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी केले आहे.