‘एमपी’च्या बसफेऱ्या बंद झाल्यामुळे एस. टी.चे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:03+5:302021-03-22T04:07:03+5:30
नागपूर : मध्यप्रदेशात जाणाऱ्या एस. टी.च्या फेऱ्या बंद झाल्यामुळे एस. टी.चे एका दिवसाला जवळपास ७ लाखाचे नुकसान होत आहे. ...
नागपूर : मध्यप्रदेशात जाणाऱ्या एस. टी.च्या फेऱ्या बंद झाल्यामुळे एस. टी.चे एका दिवसाला जवळपास ७ लाखाचे नुकसान होत आहे.
नागपूर तसेच विदर्भातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या वतीने मध्यप्रदेशात वाहतूक सुरू करण्यात आली. एकट्या गणेश पेठ आगारातून मध्यप्रदेशात ६ बसेस, तर संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून २२ बसेस पाठविण्यात येतात. गणेश पेठ आगाराला एका दिवशी १.५० लाख उत्पन्न मिळते, तर नागपूर विभागाला एकूण ७ लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळते. परंतु मध्यप्रदेशात जाणाऱ्या फेऱ्या बंद असल्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय होत असून, एस. टी.चेही आर्थिक नुकसान होत आहे. गणेशपेठ आगारात मध्य प्रदेशातील प्रवासी येत असून, बस नसल्यामुळे ते परत जात असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिली.
.......