डिझेलमुळे ट्रॅव्हल्सची झाली भाडेवाढ, पुण्याचे भाडे १२०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:11 AM2021-08-21T04:11:12+5:302021-08-21T04:11:12+5:30
नागपूर : डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी प्रवासभाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे राखी पौर्णिमेला आपल्या मीळ गावी जाणाऱ्या प्रवाशांना ...
नागपूर : डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी प्रवासभाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे राखी पौर्णिमेला आपल्या मीळ गावी जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसत आहे. दरम्यान, ९०० ते ९५० रुपये तिकीट असलेल्या पुण्यासाठी आता तब्बल १२०० रुपये मोजावे लागणार आहेत.
या मार्गावर झाली भाडेवाढ
मार्ग आधीचे भाडे (रुपयात) आताचे भाडे (रुपयात)
१) नागपूर-नांदेड ५५० ६५०
२) नागपूर-पुणे ९५० १२००
३) नागपूर-धुळे ८०० ९००
४) नागपूर-औरंगाबाद ६५० ७५०
५) नागपूर-सोलापूर ९०० १०००
ट्रॅव्हल्सची संख्या आठ पटीने वाढली
-लॉकडाऊनमध्ये नागपूर शहरातून केवळ पाच ट्रॅव्हल्स धावत होत्या. परंतु अनलॉकनंतर प्रवासी घराबाहेर पडत असल्यामुळे सध्या ३० टक्के ट्रॅव्हल्सची वाहतूक वाढली आहे. सध्या नागपूर शहरातून जवळपास ५० ट्रॅव्हल्स बाहेरगावी जात असल्याची माहिती ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिली.
डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ
‘डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅव्हल्सचे भाडे ४०० रुपयांनी वाढविणे गरजेचे होते. परंतु सध्या केवळ १५० ते २०० रुपये भाडेच वाढविण्यात आले आहे.’
-महेंद्र लुले, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेंपो, टँकर बस वाहतूक महासंघ
.............