धुक्यामुळे नागपुरातील विमानसेवा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:52 AM2018-12-11T00:52:22+5:302018-12-11T00:53:38+5:30

नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. यातच धुक्याने संपूर्ण शहराला व्यापले आहे. याचा परिणाम विमान सेवेवरही पडला आहे. विमानसेवा प्रभावित झाली असून, १२ पेक्षा अधिक विमानांना उशीर झाला. नागपूर ते मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता विमानसेवा प्रभावित झाली.

Due to the fog affected Nagpur airport | धुक्यामुळे नागपुरातील विमानसेवा प्रभावित

धुक्यामुळे नागपुरातील विमानसेवा प्रभावित

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ विमानांना उशीर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. यातच धुक्याने संपूर्ण शहराला व्यापले आहे. याचा परिणाम विमान सेवेवरही पडला आहे. विमानसेवा प्रभावित झाली असून, १२ पेक्षा अधिक विमानांना उशीर झाला. नागपूर ते मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता विमानसेवा प्रभावित झाली.
सोमवारी धुक्यामुळे इंडिगो एअरलाईन्सचे ६ ई ४२७ बंगळुरू-नागपूर विमान तब्बल ५५ मिनिटे उशिराने सायंकाळी ७.२० वाजता पोहोचले. ६ ई ७१३६ हैदराबाद-नागपूर २१ मिनिटे उशिरा, ६ ई ३५६ बंगळुरू ते नागपूर ५२ मिनिटे, जेटलाईटचे एस-२ ८७९ मुंबई- नागपूर ३५ मिनिटे उशिरा म्हणजे सायंकाळी ५.५५ वाजता आले. इंडिगोचे ६ ई ४०३ मुंबई-नागपूर १.३६ तास उशिरा सायंकाळी ७.६ वाजता पोहोचले. ६ ई ४३६ इंदूर-नागपूर २४ मिनिटे उशिरा ८.१९ वाजता, जेटलाईटचे ८६५ मुंबई-नागपूर विमान रात्री एक तास उशिराने १०.२० वाजता उतरले. इंडिगोचे दिल्ली-नागपूर विमान अर्धा तास उशिरा म्हणजे रात्री १० वाजता आले. गो एअरचे नागपूर-मुंबई जी ८-८११ हे विमान पहाटे ५.४२ वाजेऐवजी तासभर उशिराने रवाना झाले. जेटचे नागपूर-दिल्ली ९ डब्ल्यू ६५३ हे विमान २२ मिनिटे उशिराने उडाले. जेटलाईटचे एस-२ ८८० नागपूर-मुंबई विमान जवळपास एक तास उशिराने उडाले. यासोबतच इतरही काही विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला.
नागपुरात धुके पसरले आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत धुक्याचा फार परिणाम नाही. असेही सांगण्यात आले आहे की, नागपूर-दिल्लीदरम्यान चालणाऱ्या काही एअरलाईन्स इतर शहरांसाठीही एका विमानाचा उपयोग करतात. दिल्लीमध्ये धुक्याचा सर्वाधिक परिणाम असल्याने उड्डाणांना उशीर होत असतो. दुसºया शहरांसाठी नंबर बदलवून फ्लाईट चालवले जाते. एका विमानाला उशीर झाला तर इतर विमानांनाही उशीर होतो.

Web Title: Due to the fog affected Nagpur airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.