धुक्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये विमानाच्या पाऊण तास घिरट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:15 AM2019-01-15T00:15:52+5:302019-01-15T00:17:47+5:30

सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूर इंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान रायपूरला रवाना करण्यात आले.

Due to the fog, winds of airplanes in the sky of Nagpur | धुक्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये विमानाच्या पाऊण तास घिरट्या

धुक्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये विमानाच्या पाऊण तास घिरट्या

Next
ठळक मुद्देमुंबई-नागपूर विमान : संतप्त प्रवाशांनी घातला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूरइंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान रायपूरला रवाना करण्यात आले.
रायपूरकडे रवाना होण्यापूर्वी संबंधित एयर ट्राफिक कंट्रोलला लँडिंगची अनुमती मागण्यात आली. आकाशात पाऊण तास घिरट्या घातल्यामुळे विमानातील इंधन संपत आले होते. विमानात रायपूरमध्ये इंधन भरण्यात आले. त्यामुळे उड्डाणाला तीन तास विलंब झाला. परिणामी, प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यांना समजावण्यासाठी इंडिगो कर्मचाऱ्यांना बरीच कसरत करावी लागली. काही प्रवाशांना नागपूरमधून मुंबईला जायचे होते. धुक्यामुळे नागपूर-बेंगळुरू विमान १ तास ३८ मिनिटे विलंबाने उडाले. नागपूर-हैदराबाद विमानाला ३३ मिनिटे तर, नागपूर-बेंगळुरू या दुसºया विमानाला ३० मिनिटे विलंब झाला. सायंकाळचे नागपूर-दिल्ली विमान २ तास ३५ मिनिटे थांबवावे लागले. हे विमान सायंकाळी ७.५० ऐवजी रात्री १०.२५ वाजता रवाना झाले.
आगमनही विलंबाने
इंडिगो एयरलाईन्सच्या काही विमानांचे आगमनही विलंबाने झाले. ६ई ७१३६ हैदराबाद-नागपूर विमान ४५ मिनिटे विलंबाने, म्हणजे सकाळी ७.५५ वाजता आले. ६ई ७१०२ हैदराबाद-नागपूर विमान ३० मिनिटे विलंबाने आले. ६ई ४२७ बँगळुरू-नागपूर विमानाला येथे येण्यास २२ मिनिटे विलंब झाला.
६ई २०२ ला इंफालमधूनच विलंब
सोमवारी सकाळी ७.२० वाजता नागपूर येथे येणारे ६ई २०२ पुणे-नागपूर विमान १.४५ मिनिटे विलंबाने आले. सूत्रांच्या माहितीनुसार, या विमानाला इंफाल येथूनच विलंब झाला. इंफालमधील वातावरण खराब असल्यामुळे विमानाला विलंब झाला.
वातावरणावर नियंत्रण नाही
काही दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांना विलंब होत आहे. प्रवासी कुठेही वेळेवर पोहोचण्यासाठी विमानातून प्रवास करतात. हा उद्देश पूर्ण न झाल्यास प्रवाशांची निराशा होते. परंतु, वातावरणावर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे वातावरण बिघडताच विमानसेवा प्रभावित झाली.

Web Title: Due to the fog, winds of airplanes in the sky of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.