गँगमॅनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:00 IST2018-12-10T23:59:45+5:302018-12-11T00:00:58+5:30
नागपूरकडे येत असलेली राजधानी एक्स्प्रेस (ट्रेन २२६९२)ल्ही तडे गेलेल्या रेल्वे रुळावरून धावत होती. दरम्यान गँगमॅनच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवरच थांबवण्यात आल्याने मोठा अपघात टळला.ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता घडली.

गँगमॅनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकडे येत असलेली राजधानी एक्स्प्रेस (ट्रेन २२६९२)ल्ही तडे गेलेल्या रेल्वे रुळावरून धावत होती. दरम्यान गँगमॅनच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवरच थांबवण्यात आल्याने मोठा अपघात टळला.ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता घडली.
राजधानी एक्स्प्रेस सोमवारी सकाळी इटारसीवरून निघाली. परंतु काला पत्थर आणि धोडरामोह दरम्यान अचानक रेल्वेला गँगमॅन महेशचंद्र मीना यांनी लाल झेंडी दाखवून थांबवण्याचा इशारा केला. परंतु रेल्वेच्या चालकाच्या लक्षात येईपर्यंत आणि ब्रेक लावत पर्यंत अर्धी रेल्वे गाडी तडे गेलेल्या रुळावर निघून गेली. गाडी थांबल्यावर चालकाच्या लक्षात सर्व प्रकार आला. अर्धा तास गाडी त्याच परिस्थितीत थांबून होती. अखेर रुळाची दुरुस्ती केल्यावर गाडी पुढे निघाली.