जीएसटीमुळे कर आतंकवादाचे उच्चाटन-मुनगंटीवार

By Admin | Published: July 3, 2017 04:10 PM2017-07-03T16:10:16+5:302017-07-03T16:10:16+5:30

जीएसटी हा देशातील क्रांतिकारक बदल आहे. यामध्ये विविध १७ प्रकारचे कर आणि १३ सेस समाप्त झाले. या कर आतंकवादाचे समूळ उच्चाटन करून जीएसटीच्या रूपाने देशात आर्थिक स्वातंत्र्याचे नवे पर्व सुरू झाले आहे.

Due to GST, the extermination of terrorism-monopoly | जीएसटीमुळे कर आतंकवादाचे उच्चाटन-मुनगंटीवार

जीएसटीमुळे कर आतंकवादाचे उच्चाटन-मुनगंटीवार

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जीएसटी हा देशातील क्रांतिकारक बदल आहे. यामध्ये विविध १७ प्रकारचे कर आणि १३ सेस समाप्त झाले. या कर आतंकवादाचे समूळ उच्चाटन करून जीएसटीच्या रूपाने देशात आर्थिक स्वातंत्र्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. यामुळे करचोरी करणाऱ्याच्या मनात भीती निर्माण झाली आहे. प्रामाणिक व्यापारी व सामान्यांना याचा त्रास होणार नाही, अशी माहिती राज्याचे अर्थ व नियोजन तथा वन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे पत्रकारांशी चर्चा करताना दिली.

जीएसटीमुळे महाराष्ट्राचे नुकसान नाही
४जीएसटीमध्ये एकच दर असतो. अन्य देशात एकच दर आहे. याची अंमलबजावणी देशात करता करण्यात आली नाही. आपल्या देशात एक मोठा वर्ग रोज हातावर आणून पानावर खाणारा आहे. ही बाब या ठिकाणी विचारात घेण्यात आली. जीएसटीमुळे पूर्वी राज्याराज्यांमध्ये असलेली जीवघेणी स्पर्धा आता संपली आहे. एकाने वॅट वाढवला, तर दुसरे राज्य कमी करायचे. यामुळे विकासाला निधी मिळत नव्हता. आता राज्यांचे नुकसान होणार नाही. ज्या राज्यात उपभोक्ता अधिक त्या राज्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. महाराष्ट्राला यामुळे नुकसान होईल, अशी शंका काहींना आहे. महाराष्ट्रात उत्पादक आणि उपभोक्ताही अधिक असल्यामुळे महाराष्ट्राचा फायदाच होणार असल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
नुकसान झाल्यास राज्यांना सेसफंडातून भरपाई
४जीएसटीमुळे एकाही राज्याला नुकसान होणार नाही. दर दोन महिन्यांनी जीएसटीचा आढावा घेतला जाणार आहे. असे झाल्यास जीएसटीच्या माध्यमातून केंद्राकडे जमा होणाऱ्या सेसफंडातून नुकसान सहन कराव्या लागणाऱ्या राज्यांना निधीची पूर्तता करण्याची तरतूद आहे, ही माहितीही ना. मुनगंटीवार यांनी दिली.

राज्यात ४१ सुविधा केंद्र
४जीएसटीबाबत योग्य माहिती देण्यासाठी राज्यात ४१ सुविधा केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक, ई-मेल आयडी उपलब्ध करून दिलेले आहे. त्यावर संपर्क साधल्यास तीन दिवसात उत्तर दिले जाणार आहे. ५ हजार १०० लोकांना प्रशिक्षित केले आहे. व्यापाऱ्यांशी नियमित चर्चा केली. २ लाख ७० हजार चार्टर्ड अकाऊंटशी जीएसटीबाबत चर्चा केल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
विक्रीकर भवनाचे नाव आता ‘जीएसटी भवन’
४देशात जीएसटी लागू झाल्याच्या दिवसापासूनच राज्याच्या मुंबईतील विक्रीकर भवनाचे नाव बदलून आता ‘जीएसटी भवन’ असे करण्यात आले असल्याचेही ना. मुनगंटीवारांनी सांगितले.

Web Title: Due to GST, the extermination of terrorism-monopoly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.