मुंबईतील मुसळधार पावसामुळे नागपूर-मुंबई रेल्वेगाड्या आज धावणार इगतपुरीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:15 PM2019-07-02T12:15:27+5:302019-07-02T12:17:31+5:30
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या संततधारेने रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांचे प्रारंभस्थळ व अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत.
ठळक मुद्देमुंबई-नागपूर गाड्या सुटणार नाशिकरोडहूनरेल्वे वाहतूक विस्कळित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या संततधारेने रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांचे प्रारंभस्थळ व अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत.
आज (दि. २) ची मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस या दोन गाड्या नाशिकरोडहून सुटतील. याखेरीज मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना इतगतपुरी येथेच थांबवण्यात येत आहे.
ढगाळ हवामान व संततधार यामुळे मुंबई विमानतळावरील दृष्यतामान कमी झाल्याचा फटका अनेक उड्डाणांना बसला असून कित्येक उड्डाणे विलंबाने होत आहेत.