नागपुरात उकाड्याने वाढविले रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:12 AM2019-06-21T00:12:52+5:302019-06-21T00:15:46+5:30
अचानक उन व ढगाळ वातावरण, त्यात उकाडा वाढल्याने नागपूरकर त्रस्त आहेत. वातावरणाच्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असल्याने व्हायरल इन्फेक्शनचा रुग्णांत वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारासोबतच दूषित पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रो, कावीळ, कमी पाणी पिल्याने होत असलेल्या डिहायड्रेशनचेही रुग्ण दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अचानक उन व ढगाळ वातावरण, त्यात उकाडा वाढल्याने नागपूरकर त्रस्त आहेत. वातावरणाच्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असल्याने व्हायरल इन्फेक्शनचा रुग्णांत वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारासोबतच दूषित पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रो, कावीळ, कमी पाणी पिल्याने होत असलेल्या डिहायड्रेशनचेही रुग्ण दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसात आर्द्रता वाढली आहे. यामुळे घामाचे प्रमाणही वाढले आहे. यावर उपाय म्हणून अनेक रस्त्यालगत मिळणाऱ्या हातठेल्यांवरील शितपेय, आईस्क्रिमचा वापर करतात. परिणामी, घशाचा इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. यातूनच व्हायरल इन्फेक्शन होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दूषित पाणी व अन्नामुळे गॅस्ट्रो व कावीळच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. मे महिन्यापर्यंत १८८१ रुग्णांची नोंद झाली आहे. घामामुळे शरीरावर पुरळ येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कमी पाणी पिले जात असल्याने डिहायड्रेशनचेही रुग्ण वाढले असून या दिवसात किडनी स्टोनचेही रुग्ण समोर येत आहेत. या दिवसांत निरोगी राहण्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबतच उघड्यावरील खाद्य पदार्थ टाळावेत. उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
किडनी स्टोनचे रुग्ण वाढले
उकाड्यामुळे शरीरातून अधिक प्रमाणात घाम जातो. यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते. किडनी स्टोन म्हणजे मूतखड्यासाठी हे कारणीभूत ठरू शकते. या दिवसांमध्ये किडनी स्टोनसोबतच गॅस्ट्रो, कावीळ, ‘मम्स’चेही रुग्ण दिसून येत आहेत.
डॉ. जय देशमुख
जनरल फिजीशियन