पोलिसांनी कारवाई न केल्याने निखीलला गमवावा लागला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:36 PM2018-05-21T22:36:33+5:302018-05-21T22:36:51+5:30

२४ तासांपूर्वी भावावर झालेल्या खुनीहल्ल्यात शांतिनगर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे निखील मेश्राम याला जीव गमवावा लागला. शांतिनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या निखीलच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आरोपी सोलंकी कुटुंबाने योजनाबद्ध पद्धतीने निखीलची हत्या केली. मनपा कर्मचारी असलेल्या निखीलच्या हत्येमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

Due to Inactiveness of the police,Nihkil had to loss his life | पोलिसांनी कारवाई न केल्याने निखीलला गमवावा लागला जीव

पोलिसांनी कारवाई न केल्याने निखीलला गमवावा लागला जीव

Next
ठळक मुद्दे२४ तासापूर्वीच भावावर झाला होता हल्लायोजनाबद्ध पद्धतीने खून केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २४ तासांपूर्वी भावावर झालेल्या खुनीहल्ल्यात शांतिनगर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे निखील मेश्राम याला जीव गमवावा लागला. शांतिनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या निखीलच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आरोपी सोलंकी कुटुंबाने योजनाबद्ध पद्धतीने निखीलची हत्या केली. मनपा कर्मचारी असलेल्या निखीलच्या हत्येमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
रविवारी रात्री रामसुमेरबाबानगर, शांतिनगर येथील रहिवासी २८ वर्षीय निखील दिगांबर मेश्राम याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात निखीलचा भाऊ विक्की, वहिनी प्रियंका, आई ललिता, बहीण मनीषा, भाऊजी इंद्रपाल मडकवार, विजय वासनिक आणि मित्र गोविंदा राऊत जखमी झाले होते. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
सूत्रानुसार आरोपी सोलंकी परिवाराचे मेश्राम कुटुंबाशी जुना वाद आहे. आरोपींना शंका आहे की, त्यांच्या मुलीचे निखीलचा भाऊ विक्कीसोबत प्रेमसंबंध आहेत. निखील आणि विक्की मनपा कर्मचारी आहेत. निखील डाक विभागात तर विक्की आरोग्य विभागात कार्यरत आहे. आठ महिन्यांपूर्वी सोलंकी कुटुंबाने विक्कीच्या विरुद्ध तक्रारही दाखल केली होती. सोलंकी परिवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने निखील आणि विक्कीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
१९ मे रोजी रात्री विक्की ड्युटीवरून घरी आला होता. रात्री ८.३० वाजता मित्राच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घरून रवाना झाला. घराजवळच सोलंकी परिवाराने विक्कीसोबत वाद घातला. त्याला मारहाण केली. विक्की या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी शांतिनगर पोलीस ठाण्यात गेला. तेव्हा सोलंकी परिवार अगोदरच ठाण्यात पोहोचला होता. सोलंकी परिवाराच्या दबावात पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला, परंतु कुठलीही कारवाई केली नाही. तक्रार नोंदविल्यामुळे सोलंकी परिवाराला पुन्हा राग आला. त्यांनी निखील व विक्कीला धडा शिकविण्याचा निश्चय केला.
रविवारी सायंकाळी निखीलच्या घरी पाहुणे आले होते. त्यामुळे निखील व विक्की आपल्या विरुद्ध लोक एकत्र करीत असल्याचा सोलंकी कुटुंबाला संशय आला. पाहुणे गेल्यावर रात्री ९.३० वाजता सोलंकी कुटुंबीयांनी निखीलच्या घरावर दगडफेक करीत हल्ला केला. तेव्हा घरासमोर विक्की, त्याचे भाऊजी आणि कुटुंबातील इतर सदस्य बसले होते. धोका ओळखून भाऊजीने विक्कीला घराच्या आत नेले. निखिल हल्लेखोरांच्या हाती लागला. हल्लेखोरांनी निखीलच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला खाली पाडले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून फरार झाले. वस्तीतील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी निखिलला तपासून मृत घोषित केले.
निखीलच्या हत्येमुळे वस्तीत तणाव पसरलेला आहे. १९ मे रोजी घडलेल्या घटनेत पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे आरोपींनी निखीलचा खून करण्याचे धाडस केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.
मुलांनीही केले वार
हल्ल्यात आरोपींचे संपूर्ण कुटुंब सहभागी होते. कुटुंबाचा प्रमुख शंकर सोलंकी, देवा सोलंकी, प्रवीण सोलंकी, सूरज राठोड, रमेश सोलंकी, इशु सोलंकी आणि परिवारातील महिला व मुलांसह २० ते २२ लोक सहभागी होते. सर्वांचाच हाती धारदार शस्त्र व इतर शस्त्र होते. ज्या पद्धतीने हल्ला करून खून करण्यात आला, त्यावरून वस्तीत कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. हल्लेखोरांनी त्यांच्या मार्गात येणाऱ्या कुणालाही सोडले नाही. शांतिनगर पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगा, आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून १९ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Due to Inactiveness of the police,Nihkil had to loss his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.