मजुरांअभावी शेतीची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:11 AM2021-02-09T04:11:25+5:302021-02-09T04:11:25+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : सध्या कुही तालुक्यात हरभऱ्याच्या पिकाची कापणी, कापसाची वेचणी आणि मिरचीच्या ताेडणीसाठी माेठ्या प्रमाणात मजुरांची ...

Due to lack of labor, farming activities stalled | मजुरांअभावी शेतीची कामे रखडली

मजुरांअभावी शेतीची कामे रखडली

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : सध्या कुही तालुक्यात हरभऱ्याच्या पिकाची कापणी, कापसाची वेचणी आणि मिरचीच्या ताेडणीसाठी माेठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासत आहे. मजूर पुरेशा प्रमाणात व वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना दुसऱ्या गावामधून वाढीव मजुरी देत मजूर आणावे लागत असून, त्यांच्या वाहतुकीचाही अतिरिक्त खर्च करावा लागताे.

गाेसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील काही गावाचे पुनर्वसन करण्यात आले. नवीन ठिकाणी तसेच तालुक्यात उद्याेग नसल्याने शेतीवर उपजीविका करण्यावाचून गत्यंतर नाही. असे असतानाही शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाही. अलीकडच्या काळात तालुक्यात हिरव्या मिरचीचे पीक घेतले जाते. मिरची ताेडण्यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांची नियमित गरज भासते. सध्या मिरचीच्या ताेडणीसाेबतच हरभऱ्याचे पीक कापणीला आला व काहींच्या शेतातील कापूस वेचणीला आला आहे. याही कामासाठी गावात मजूर मिळेनासे झाले आहे. गावात मजूर मिळत नसल्याने त्यांना पुनर्वसित गावामधून मजूर आणावे लागतात आणि सायंकाळी काम आटाेपल्यानंतर त्यांना वाहनाने त्यांच्या गावांमध्ये साेडावे लागते.

वाढीव मजुरी देऊनही वेळेवर मजूर मिळत नसल्याने प्रसंगी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. शेतमालाला बाजारात समाधानकारक भाव मिळत नसल्याने पदरी ताेटाच पडत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे, मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याेग्य काळजी घ्यावी, अशी मागणीही केली जात आहे.

....

धाेकादायक वाहतूक

मजुरांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जाताे. ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत दाटीवाटीने मजूर बसतात. त्यात महिला मजुरांची संख्या अधिक असते. राेडवरील खड्ड्यांमुळे किंवा अनियंत्रित वेगामुळे ट्राॅली उलटून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध प्रवासी वाहतुकीला बंदी असल्याने पाेलिसांनी ट्रॅक्टर पकडल्यास पाेलिसांना चिरीमिरी देऊन कारवाई टाळावी लागते. याचा भुर्दंडही शेतकऱ्यांनाच सहन करावा लागताे.

...

उत्पादनखर्चात वाढ

यावर्षी बाेंडअळी व बाेंडसडमुळे कापसाच्या तर मरराेग व घाटेअळीच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट आली आहे. या किडी व राेगाच्या तावडीतून पिकांना वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागल्याने आधीच उत्पादनखर्च वाढला आहे. त्यातच महिलांची मजुरी प्रति दिवस २०० रुपयावरून २५० रुपयावर गेल्याने तसेच त्यांच्या वाहतुकीवर अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने यात आणखी भर पडली आहे.

Web Title: Due to lack of labor, farming activities stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.