लेन्स नसल्याने मोतीबिंदूच्या १७ लाख शस्त्रक्रिया प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 05:12 AM2018-10-21T05:12:25+5:302018-10-21T05:12:46+5:30
महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहिम हाती घेतली आहे.
- सुमेध वाघमारे
नागपूर : महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहिम हाती घेतली आहे. परंतु या शस्त्रक्रियेसाठी लागणारे ‘लेन्स’ व इतर साहित्याचा पुरवठा आरोग्य विभागाकडूनच गेल्या सहा महिन्यांपासून देणे बंद झाल्याने या मोहिमेला ग्रहण लागले आहे. महाराष्टÑात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
‘राष्टÑीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिल्या जाते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ‘रिजीड लेन्स’सोबतच ‘व्हीस्कोमॅट’ व ‘डिस्पोजेबल सर्जिकल ब्लेड’ मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाते. परंतु एप्रिल २०१८ पासून साहित्याचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. परिणामी, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया प्रभावित झाल्या आहेत.
नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्ये सर्वाधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होतात. या रुग्णालयाने या वर्षी एक हजार लेन्सची मागणी केली होती. परंतु पुरवठा न झाल्याने
गडचिरोली जिल्ह्यातील १५० लेन्स आणण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
>मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारे लेन्स व इतर साहित्य आरोग्य विभागाकडून एप्रिलपासून मिळालेले नाही.
-डॉ. देवेंद्र पातुरकर
जिल्हाशल्यचिकित्सक, नागपूर