पावसामुळे नागपुरात विमानांच्या उड्डाणांना खोळंबा, प्रवाशांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 08:56 PM2018-07-06T20:56:45+5:302018-07-06T22:06:45+5:30

मुसळधार पावसामुळे नागपुरातून अन्य ठिकाणी उड्डाण भरणारी १२ विमाने आणि अन्य ठिकाणांहून नागपुरात येणारी ५ विमाने निर्धारित वेळेपेक्षा उशिरा आली आणि उड्डाण भरले. दृश्यता नसल्यामुळे इंडिगोचे मुंबईहून नागपुरात सकाळी १० वाजता येणारे विमान हैदराबादला वळविण्यात आले. याशिवाय एअर इंडियाचे रात्री निर्धारित ८.३५ वाजता येणारे विमान २ तास ५ मिनिटे उशिराने नागपुरात आल्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात मुक्कामी असणारे मंत्री आणि आमदारांना त्रास सहन करावा लागला.

Due to the rains, detention of aircraft in Nagpur and effect on passengers | पावसामुळे नागपुरात विमानांच्या उड्डाणांना खोळंबा, प्रवाशांना त्रास

पावसामुळे नागपुरात विमानांच्या उड्डाणांना खोळंबा, प्रवाशांना त्रास

Next
ठळक मुद्दे १२ विमानांनी उशिरा उड्डाण भरले तर ५ उशिरा आली : इंडिगोचे विमान हैदराबादला वळविले


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसामुळे नागपुरातून अन्य ठिकाणी उड्डाण भरणारी १२ विमाने आणि अन्य ठिकाणांहून नागपुरात येणारी ५ विमाने निर्धारित वेळेपेक्षा उशिरा आली आणि उड्डाण भरले. दृश्यता नसल्यामुळे इंडिगोचे मुंबईहून नागपुरात सकाळी १० वाजता येणारे विमान हैदराबादला वळविण्यात आले. याशिवाय एअर इंडियाचे रात्री निर्धारित ८.३५ वाजता येणारे विमान २ तास ५ मिनिटे उशिराने नागपुरात आल्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात मुक्कामी असणारे मंत्री आणि आमदारांना त्रास सहन करावा लागला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या विमानांच्या शेड्युलनुसार १२ विमानांनी नागपुरातून उशिरा उड्डाण भरले तर दिल्ली, पुणे, मुंबई आणि कोलकाता येथून नागपुरात येणारी ५ विमाने उशिरा आली. त्याचा प्रवाशांना फटका बसला. जेट एअरवेजचे नागपूर-दिल्ली विमान सकाळी ८.२० या निर्धारित वेळेपेक्षा ३६ मिनिटे उशिरा, नागपूर-मुंबई विमान सकाळी १०.२७ वाजता म्हणजेच १ तास २२ मिनिटे उशिरा आणि नागपूर-हैदराबाद विमानाने ५० मिनिटे उशिरा उड्डाण भरले.
जेट लाईटचे नागपूर-मुंबई विमान निर्धारित सकाळी ९.०५ या निर्धारित वेळेपेक्षा १ तास २२ मिनिटे उशिरा तर गो-एअर कंपनीचे नागपूर-मुंबई विमान निर्धारित सकाळी ९.२० या निर्धारित वेळेपेक्षा तब्बल ५ तास ४ मिनिटे उशिरा अर्थात दुपारी २.२४ वाजता उड्डाण भरले. तसेच इंडिगोचे नागपूर-मुंबई हे विमान सकाळी ठराविक १०.३० वेळेपेक्षा ४ तास २७ मिनिटे उशिरा मुंबईकडे रवाना झाले. इंडिगोचे नागपूर-पुणे विमान १ तास २ मिनिटे उशिरा, एअर-एशियाचे नागपूर-बेंगळुरू विमान १ तास उशिरा आणि इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान १ तास ३ मिनिटांनी उशिरा उड्डाण भरले.
याशिवाय पावसामुळे अन्य ठिकाणांहून नागपुरात येणारी पाच विमाने उशिरा आल्यामुळे त्या विमानाने नागपुरातून उशिरा उड्डाण भरले. त्यामुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागला. जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर विमान २८ मिनिटे उशिरा, गो-एअरचे पुणे-नागपूर विमान २० मिनिटे उशिरा, इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान ३५ मिनिटे उशिरा, एअर-एशियाचे कोलकाता-नागपूर विमान निर्धारित वेळेपेक्षा ३४ मिनिटे उशिरा नागपुरात आली.

विमानतळाच्या चेकअप काऊंटरजवळ पाणी जमा        

मुसळधार पावसामुळे विमानतळ आणि लगतच्या परिसरातील प्रशासनाची दुरवस्था उघड झाली. पावसामुळे विमानतळाच्या चेकअप काऊंटरजवळ पाणी जमा झाले. छतावरून पडणारे पाणी कर्मचारी वायपरने सतत साफ करीत होते. 
शुक्रवारी पावसामुळे विधानसभेचे कामकाज रद्द झाल्यानंतर मुंबईसह अन्य ठिकाणी रवाना झालेले मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना परतावे लागले. विमानतळावर पोहोचण्याआधी त्यांना वर्धा रोडवर जमा झालेल्या पाण्यातून मार्ग काढताना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यानंतर विमानतळ टर्मिनल बिल्डिंगच्या आतही प्रवाशांना दिलासा मिळाला नाही. चेकअप काऊंटरजवळ पाणी छतातून टपकत होते. खासगीकरणाच्या मार्गावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळाच्या आत आणि परिसरात पाणी शिरण्याचा क्रम जारी आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी शासनाकडून अपेक्षा आहे. 
टर्मिनल बिल्डिंगच्या छतावरून पाणी टपकण्याच्या अनेक खुणा दिसत आहेत. या संदर्भात मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चेकअप काऊंटरजवळ पाणी छतातून टपकत असल्याची बाब मान्य केली. छत तातडीने दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

विमानतळाच्या सुरक्षा भिंतीचा भाग कोसळला

  विमानतळाच्या परिसरातील सोनेगांव तलावापुढील सुरक्षा भिंतीचा काही भाग शुक्रवारी मुसळधार पावसामुळे कोसळला. सोनेगाव तलावाकडील विमानतळाच्या काही भागात सुरक्षा भिंत झुकल्याचे दिसून येत आहे. 
एमआयएलचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी सांगितले की, विमानतळाच्या सुरक्षा भिंतीलगत काही घरे बनली आहे. त्यामुळे विमानतळावरील पाणी पूर्णपणे वाहून जाण्यासाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे सुरक्षा भिंतीचा काही भाग यामुळे तुटला आहे. पाणी वाहून जाण्यास जागाच नसल्यामुळे रस्त्याचा काही भागातही खचला आहे.

Web Title: Due to the rains, detention of aircraft in Nagpur and effect on passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.