नागपुरात एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:19 PM2018-02-22T23:19:20+5:302018-02-22T23:24:15+5:30

रायपूरवरून नागपूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या विमानाला आज सकाळी एका पक्ष्याने धडक दिली. या अपघातात पायलटसह प्रवासी बालंबाल बचावले. नागपूरमध्ये हे विमान उतरत असताना हा अपघात घडला. या विमानात दुर्गचे खासदार ताम्रध्वज साहू यांच्यासह १६३ प्रवासी आणि क्रु मेंबर होते.

Due to snag Air India flight immergency land in Nagpur | नागपुरात एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक

नागपुरात एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक

Next
ठळक मुद्देप्रवाशी बालंबाल बचावले : नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रायपूरवरून नागपूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या विमानाला आज सकाळी एका पक्ष्याने धडक दिली. या अपघातात पायलटसह प्रवासी बालंबाल बचावले. नागपूरमध्ये हे विमान उतरत असताना हा अपघात घडला. या विमानात दुर्गचे खासदार ताम्रध्वज साहू यांच्यासह १६३ प्रवासी आणि क्रु मेंबर होते.
विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी एअर इंडियाचे विमान जे. ४६९ हे दिल्लीवरून सकाळी ६.५५ वाजता आकाशात झेपावले. हे विमान सकाळी ८.१५ वाजता रायपूरला पोहोचले. रायपूरवरून दिल्ली आणि नागपूरचे जवळपास १५० प्रवासी घेऊन जे. ४७० हे विमान सकाळी ८.४५ वाजता आकाशात झेपावले. नागपूरच्या आकाशात पोहोचताच सकाळी ९.२५ वाजता या विमानाच्या विंगफ्लायमध्ये एक पक्षी धडकला. पक्षी धडकल्याची माहिती मिळताच पायलटने समयसूचकता दाखवून विमान सुरक्षितरीत्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविले. पक्षी विमानाला धडकल्यामुळे विमानाला पुढील प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. अभियंता विमानाच्या दुरुस्तीला लागले. या विमानाने जाणाºया प्रवाशांना पॅसेंजर लाऊंजमध्ये बसविण्यात आले. त्यानंतर दिल्लीवरून एअर इंडियाचे एक विशेष विमान बोलविण्यात आले. या सर्व प्रवाशांना दुपारी ३ वाजता दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी हैदराबाद-रायपूर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते नागपुरात उतरविण्यात आल्याचे तसेच प्रवाशांना रायपूरला नेण्यासाठी दिल्ली-रायपूर विमान नागपुरात उतरविण्यात आल्याची माहिती दिली.
गो एअरचे विमानही अडकले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गो एअरचे विमान बुधवारी रात्री नागपूरला आले. गुरुवारी सकाळी ५ वाजता हे विमान बेंगळुरुला जाणार होते. परंतु त्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान नियोजित वेळेत जाऊ शकले नाही. विमानाची दुरुस्ती केल्यानंतर सकाळी ११ वाजता हे विमान रवाना झाले.
 

Web Title: Due to snag Air India flight immergency land in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.