स्फोटाच्या आवाजामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:13 PM2019-04-22T23:13:24+5:302019-04-22T23:14:58+5:30
सोमवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात ५.३० वाजताच्या सुमारास एका वाहनाजवळ स्फोट झाल्याचा आवाज आला. या आवाजामुळे वाहनात बसलेल्या महिला जोरात ओरडल्या. सर्वांनी या वाहनाकडे धाव घेतली. अखेर वाहनाचा टायर फुटल्याचे लक्षात येताच, सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात ५.३० वाजताच्या सुमारास एका वाहनाजवळ स्फोट झाल्याचा आवाज आला. या आवाजामुळे वाहनात बसलेल्या महिला जोरात ओरडल्या. सर्वांनी या वाहनाकडे धाव घेतली. अखेर वाहनाचा टायर फुटल्याचे लक्षात येताच, सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांना सोडण्यासाठी येणारे नागरिकांची गर्दी राहते. ड्रॉप अॅण्ड गो झोनमध्येही वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमार ड्रॉप अॅण्ड गो झोनमधून एक मिनी बस जात होती. या बसमध्ये काही महिला बसलेल्या होत्या. अचानक जोरात स्फोट झाल्याचा आवाज झाला आणि बसमधील महिला ओरडल्या. आवाजामुळे परिसरातील नागरिकही या बसकडे धावले. शेजारीच लोहमार्ग पोलीस ठाणे असल्यामुळे ठाण्यातील पोलिसही बसकडे धावले. बघ्यांची गर्दी जमा झाली. बसमधील महिला गडबडीने खाली उतरल्या. अखेर सर्वांना या बसचा टायर फुटल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.