बँकांच्या संपामुळे नागपुरात कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:10 AM2018-05-31T00:10:21+5:302018-05-31T00:10:30+5:30
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या आवाहनार्थ नागपुरातील सर्व बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाच्या पहिल्या दिवशी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे कोट्यवधींचे क्लिअरिंग व अन्य आर्थिक व्यवहार झाले नाहीत. शिवाय पहिल्याच दिवशी बहुतांश एटीएम कोरडे होते. पहिल्या दिवशी संप यशस्वी झाल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या आवाहनार्थ नागपुरातील सर्व बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाच्या पहिल्या दिवशी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे कोट्यवधींचे क्लिअरिंग व अन्य आर्थिक व्यवहार झाले नाहीत. शिवाय पहिल्याच दिवशी बहुतांश एटीएम कोरडे होते. पहिल्या दिवशी संप यशस्वी झाल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.
असोसिएशनचा दोन टक्के वेतनवाढीच्या प्रस्तावावर आक्रोश दिसून आला. दहाव्या वेतन करारानुसार १५ टक्के वेतनवाढ तसेच यूएफबीयूच्या चार्टर आॅफ डिमांडमध्ये २५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव आहे. संपाच्या पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता सर्व बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर एकत्रित झाले आणि नारेबाजी केली. त्यानंतर चार हजारांपेक्षा जास्त कर्मचारी मोर्चाद्वारे स्टेट बँक आॅफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक चौकातून अलाहाबाद बँकेसमोर गोळा झाले. यावेळी असोसिएशनचे नेते अनंत कुळकर्णी, सुरेश बोभाटे, प्रदीप येळणे, जयवंत गुर्वे, एल.पी. नंदनवार, नितीन बारवणकर, प्रदीप चक्रवर्ती, वीरेंद्र गेडाम आणि सुरभी शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
संचालन सत्यशील रेवतकर यांनी तर स्वयंप्रकाश तिवारी यांनी आभार मानले. संपाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद वासनिक, श्रीकृष्ण चेंडके, प्रभात काकाश, दर्शन नायडू, विजय ठाकूर, विद्या जोशी, चंदा साने, दिनेश मेश्राम, मनोहर अगस्ती, माधव पोफळी, अशोक अतकरे आणि प्रतिभा मसराम यांनी परिश्रम घेतले.