नागपुरातील मोमीनपुरा भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे घराघरात कावीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 09:32 PM2018-12-05T21:32:00+5:302018-12-05T21:36:01+5:30

प्रभाग ८ मोमिनपुरा येथील तकिया दिवानशहा परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शेकडो घरात कावीळचे रुग्ण वाढले आहेत. घराघरात कावीळचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संताप असून, बुधवारी हा संताप मोमिनपुऱ्यात अनुभवायला आला. महिलांनी रस्त्यावर येऊन मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.

Due to supply of contaminated water jaundice spread in Mominpura area of ​​Nagpur | नागपुरातील मोमीनपुरा भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे घराघरात कावीळ

नागपुरातील मोमीनपुरा भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे घराघरात कावीळ

Next
ठळक मुद्देतकिया, दिवानशाह परिसरात उद्रेक : नागरिकांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रभाग ८ मोमिनपुरा येथील तकिया दिवानशहा परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शेकडो घरात कावीळचे रुग्ण वाढले आहेत. घराघरात कावीळचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संताप असून, बुधवारी हा संताप मोमिनपुऱ्यात अनुभवायला आला. महिलांनी रस्त्यावर येऊन मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.
परिसरातील मो. तौकीर म्हणाले की, त्यांच्या घरात मोठा भाऊ मो. अतिक व मो. रफीक यांना कावीळ झाला आहे. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मशीद दारुल फलाहजवळ राहणाऱ्या आफरीन कौसर यांना कावीळ झाला आहे. मो. नसीर म्हणाले की, पाण्यातून दुर्गंधी येत आहे. घरातील १४ वर्षीय मुलाला कावीळ झाला आहे. अशा अनेक तक्रारी परिसरातील नागरिकांनी लोकमत पुढे व्यक्त केल्या. एमआयएमचे रिजवान अन्सारी म्हणाले की, दूषित पाणीपुरवठा ही संपूर्ण प्रभागाची समस्या आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधींची भूमिका मूकदर्शक बनली आहे.
दोन महिन्यापासून दूषित पाण्याची समस्या 


तकिया दिवानशाह परिसरात गेल्या दोन महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात बऱ्याचदा स्थानिक नगरसेवकांना तक्रारीही केल्या आहेत. नगरसेवकाकडून समस्या सोडविल्या जात नाही, उलट सल्ले दिले जातात की पाणी उकळुन प्यावे. नागरिकांचा आरोप आहे की, नगरसेवक नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंतसुद्धा पोहोचवीत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाण्यासाठी करावी लागते भटकंती
मोमिनपुऱ्यातील तकिया दिवानशाह येथे होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे घराघरात कावीळ पसरल्याने नागरिक चिंतित आहेत. अशात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची सोय दुसऱ्या वस्तीतून करावी लागत आहे.

 

Web Title: Due to supply of contaminated water jaundice spread in Mominpura area of ​​Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.