जुन्या वैमनस्यातून नातेवाईकांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास केले जखमी
By दयानंद पाईकराव | Updated: May 28, 2023 13:24 IST2023-05-28T13:24:22+5:302023-05-28T13:24:32+5:30
ही घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १० ते १०.३० दरम्यान घडली.

जुन्या वैमनस्यातून नातेवाईकांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास केले जखमी
नागपूर : जुन्या वैमनस्यातून नातेवाईकांनी शिविगाळ करून डोक्यावर प्लास्टीकच्या दांड्याने मारून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास जखमी केले. ही घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १० ते १०.३० दरम्यान घडली.
मो. आसीफ मो. शफी (वय ३२, रा. वैभव लक्ष्मीनगर कळमणा) असे जखमी झालेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे नाव आहे. तर अब्दुल गणी मोहम्मद शफी (वय ४५), शमीना परविन अब्दुल गणी (वय ३६) दोघे रा. हंसापुरी आणि अबीब उर्फपरवेज अजीज खान (वय ३२, रा. मोठा ताजबाग) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी मो. आसीफ यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी शमीना परविनने मो. आसीफ यांना शिविगाळ केली. तर आरोपी अब्दुल गणी आणि अबीब यांनी प्लास्टीकच्या दांड्याने मो. आसीफ यांच्या डोक्यावर मारून जखमी केले. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. मो. आसीफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३२४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी अब्दुल गणी व अबीब उर्फ परवेजला अटक केली आहे.