सिमेंट रोडच्या कामामुळे विविध मार्गावर वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 09:02 PM2019-09-19T21:02:10+5:302019-09-19T21:03:45+5:30
शहरातील विविध भागात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान विविध मार्गावरील एका बाजूची वाहतूक तर काही मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान विविध मार्गावरील एका बाजूची वाहतूक तर काही मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे.यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आदेश निर्गमित केले आहे.
सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये पॅकेज क्रमांक ८ मधील रस्ता क्रमांक ३१, एक स्तंभ चौक ते नार्थ अंबाझरी रोड (अजित बेकरी)दरम्यान सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यामार्गावरील उजव्या बाजूची वाहतूक १४ डिसेंबर २०१९ पर्यंत बंद राहील. याशिवाय पॅकेज क्र. ६ मधील क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा (रस्ता क्र.२१) मार्गावरील उजवीकडील वाहतूक १८ नोव्हेंबर पर्यंत बंद राहील. पॅकेज क्र.२ मधील रस्ता क्रमांक ३, आझाद चौक ते अयाचित मंदिर व झेंडा चौक ते सक्करदरा चौक व्हाया जुनी शुक्रवारी दरम्यानची वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे. गजानन चौक ते सक्करदरा चौक दरम्यानची डाव्या बाजूची वाहतूक ३१ डिसेंबरपर्यंत बंद करण्यात येईल.
पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १५, नारा घाट कुशीनगर ते साई मंदिर रिंग रोड चौक दरम्यानची वाहतूक १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत बंद राहील. पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १३ टेका नाका चौक ते नारी गाव पैकी मार्गावरील वाहतूक १० ऑक्टोबर पर्यंत बंद राहील. पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १८ बापुना वाईन शॉप ते गुरूनानक सोसायटी जी कुमार आरोग्यधाम पर्यंतची दोन्ही बाजूची वाहतूक १० ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे. पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १९ कुकरेजा नगर ते कस्तुरबा नगर गल्ली नं. १,२,३,४ कस्तुरबा नगर झोपडपट्टी दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी बंद राहील. सदर मार्गांवरील वाहतूक अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यात येईल. यासंबंधीचे आदेश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.