आठवड्यात सोन्यात १०० ची वाढ तर चांदी १२०० रुपयांनी घसरली
By मोरेश्वर मानापुरे | Published: June 30, 2024 06:12 PM2024-06-30T18:12:10+5:302024-06-30T18:12:36+5:30
नागपूर : गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या घडामोडींचा परिणाम नागपुरातील सराफा बाजारात दिसून आला. सहा दिवसात सोने १०० रुपयांनी ...
नागपूर : गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या घडामोडींचा परिणाम नागपुरातील सराफा बाजारात दिसून आला. सहा दिवसात सोने १०० रुपयांनी वधारले. तर चांदीचे भाव तब्बल १२०० रुपयांनी उतरले. ग्राहक आवश्यकतेसाठीच सोन खरेदी करीत असल्याचे सराफांनी सांगितले.
सोमवार, २४ रोजी बाजार बंद होतेवेळी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ७१,९०० आणि चांदीचे भाव ८९,३०० रुपयांवर स्थिरावले. या शनिवार, २२ जूनच्या तुलनेत भावात अनुक्रमे १०० आणि ३०० रुपयांची वाढ झाली. मंगळवार, २५ रोजी सोने १०० रुपये आणि चांदीत ४०० रुपयांची घसरण झाली. बुधवार, २६ जूनला सोने २०० रुपये आणि चांदीचे भाव तब्बल १८०० रुपयांनी उतरले. मात्र, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने ५०० रुपये आणि चांदीत १२०० रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे १०० आणि ६०० रुपयांची वाढले.
मात्र, शनिवारी सोन्याचे भाव स्थिर होते, परंतु चांदीत ८०० रुपयांची घसरण झाली. या घडामोडीनुसार नागपुरात गेल्या आठवड्यात सोने १०० रुपयांनी वाढले तर चांदीचे भाव १२०० रुपयांनी उतरले. शनिवारी सोने ७२ हजार आणि चांदीचे भाव ८८,१०० रुपयांवर पोहोचले. या दरावर सराफांकडून ३ टक्के जीएसटी आकारला जातो. यानुसार सराफांकडे दहा ग्रॅम शुद्ध (२४ कॅरेट) सोने ७४,१६० आणि शुद्ध चांदीचे भाव ९०,७४३ रुपये होते.