समानतेच्या भावनेने कर्तव्य पार पाडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2016 03:19 AM2016-04-14T03:19:04+5:302016-04-14T03:19:04+5:30
अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करताना लोकांशी ममता व समानतेच्या भावनेने वागावे, असा संदेश गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी येथे केले.
राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा अधिकाऱ्यांना संदेश : आयआरएसच्या ६८ व्या बॅचचा दीक्षांत समारंभ
नागपूर : अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करताना लोकांशी ममता व समानतेच्या भावनेने वागावे, असा संदेश गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी येथे केले.राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) ६८ व्या बॅचच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणोत्तर दीक्षांत समारंभाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. या समारंभात राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या महासंचालिका गुंजन मिश्रा, अतिरिक्त महासंचालक - १ आर.के. चौबे, अतिरिक्त महासंचालक - २ मदनेश मिश्रा, अतिरिक्त महासंचालक - ३ लीना श्रीवास्तव, कोर्स संचालक सुनील उमप, अतिरिक्त कोर्स संचालक - १ लियाकत अली आणि अतिरिक्त कोर्स संचालक - २ धनंजय वंजारी उपस्थित होते. १६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १५२ अधिकाऱ्यांना सिन्हा यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.