उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा; बसस्थानके चकचकीत होणार, नागपुरातून होणार सुरुवात
By नरेश डोंगरे | Updated: April 15, 2023 12:27 IST2023-04-15T12:27:02+5:302023-04-15T12:27:44+5:30
मुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय मंत्री गडकरींची मान्यता

उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा; बसस्थानके चकचकीत होणार, नागपुरातून होणार सुरुवात
नागपूर : राज्यातील सर्व मोठ्या शहरातील बसस्थानके (बसपोर्ट) एअरपोर्टसारखी चकचकीत केली जाणार आहेत. त्याची सुरुवात नागपुरातील बसस्थानकापासून होईल, असा संकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका कार्यक्रमात मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला मान्यता दिली.
महाराष्ट्र रेल ईन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) तर्फे विदर्भातील सहा उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नागपुरातील अजनी रेल्वे पुलासह सहा पुलांच्या कामांचे भूमीपूजन फडणवीस-गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.