दोन हजार दिव्यांगांना मिळणार ई-स्मार्ट कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:18 PM2019-02-19T12:18:16+5:302019-02-19T12:19:34+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ‘मिशन झिरो पेंडन्सी’ दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम उपक्रमांतर्गत शहरातील दोन हजार दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड मिळणार आहेत.

E-Smart card will be available for two thousand Divyang | दोन हजार दिव्यांगांना मिळणार ई-स्मार्ट कार्ड

दोन हजार दिव्यांगांना मिळणार ई-स्मार्ट कार्ड

Next
ठळक मुद्देआयआरसीटीसीचा पुढाकार रेल्वे प्रवासातील सुविधा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ‘मिशन झिरो पेंडन्सी’ दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम उपक्रमांतर्गत शहरातील दोन हजार दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड मिळणार आहेत. त्याअंतर्गत महापालिका, समाज कल्याण विभाग, अपंग कल्याण विभाग आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्यावतीने सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या मनीषा अतकरे, रश्मी धुर्वे, नगरसेवक दिनेश यादव, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, समग्र शिक्षा तथा जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अभिजित राऊ त आदी उपस्थित होते.
विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांगांजवळ अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मिशन झिरो पेंडन्सी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सहा हजार दिव्यांग बांधवांना घरपोच प्रमाणपत्र देण्याची मोहीम राबविली जात आहे.
आयआरसीटीसीद्वारे प्रदान करण्यात येणाºया ई-स्मार्ट कार्डमुळे दिव्यांग व्यक्तींना आॅनलाईन तिकीट सवलतीच्या दरात मिळणार आहे. तिकीटसाठीही दिव्यांगांना रांगेत उभे राहावे लागणार नाही. प्रवासादरम्यान ई-स्मार्ट कार्ड सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात येणाºया प्रवास सवलतीमुळे अनेक दिव्यांगांना लाभ होणार आहे. ई-स्मार्ट कार्डमुळे दिव्यांगांना प्रवासासाठी विविध दस्तावेज बाळगण्याची गरज नसून, एका ई-स्मार्ट कार्डमुळे रेल्वे प्रवासातील सर्व सुविधांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना भारतीय रेल्वे प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेले युनिक आयडी कार्ड (आयआरसीटीसीद्वारे सवलत आधारित ई-तिकीट) योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ई-स्मार्ट कार्डकरिता दिव्यांगांकडून रेल्वे सवलत प्रमाणपत्र, छायाचित्र ओळख पुरावा, जन्माचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रेल्वे फोटो ओळखपत्र मिळविण्याकरिता संबंधित कागदपत्रांची एक छायाप्रत संच प्रमाणित (स्वयं प्रमाणित) करून दोन हजार दिव्यांग बांधवांचे दस्तावेज मागविण्यात आले. संपूर्ण दस्तावेज मनपाचा समाज कल्याण विभाग व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्यावतीने तयार करून जिल्हाधिकारी नागपूर यांच्या पत्रासह रेल्वे विभागास सादर करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे प्राप्त होणारे दोन हजार युनिक आयडी कार्ड आयआरसीटीसीद्वारे सवलत आधारित ई-तिकीट प्रमाणपत्र दिव्यांग बांधवांना घरपोच देणे, शहरी भागातील दिव्यांगांना शासकीय टपालाद्वारे, उपरोक्त योजनेची तपशील माहिती दिव्यांग बांधवांना व्हावी याकरिता योजनेचे माहितीपत्रक तयार करणे आदीबाबत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यावतीने निर्देशित करण्यात आले आहे.

Web Title: E-Smart card will be available for two thousand Divyang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.