खापरखेड्यात ई-तिकीट दलालास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:54+5:302021-01-15T04:08:54+5:30

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने खापरखेडा येथे रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करून त्याच्याकडून १२ जुन्या तिकिटांसह १५ ...

E-ticket broker arrested in Khaparkheda | खापरखेड्यात ई-तिकीट दलालास अटक

खापरखेड्यात ई-तिकीट दलालास अटक

googlenewsNext

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने खापरखेडा येथे रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करून त्याच्याकडून १२ जुन्या तिकिटांसह १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

धर्मपाल देशभ्रतार (वय ३४) रा. वॉर्ड नं. ४, खापरखेडा असे अटक करण्यात आलेल्या दलालाले नाव आहे. त्याचे खापरखेडा येथे उन्नती कॉम्प्युटर अँड झेरॉक्स सेंटर हे दुकान आहे. तो पर्सनल आयडीवरून ग्राहकांना ई तिकीट उपलब्ध करून देत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या मोतीबाग रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक आर. एल. मीना, हेड कॉन्स्टेबल प्रकाश रायसेडाम, विजय विठोले, पूनम सांगवान यांनी बुधवारी सायंकाळी धाड टाकली. यावेळी आरोपीजवळ १००३५ रुपये किमतीची १२ जुनी तिकिटे आढळली. आरोपीकडून एक संगणक, एक मोबाईल, एक प्रिंटर, नगदी ३५० रुपये यांसह १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: E-ticket broker arrested in Khaparkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.