प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात असेल ‘फोल्डस्कोप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:40 AM2018-12-01T01:40:18+5:302018-12-01T01:41:31+5:30

केंद्र सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला असला तरी, ग्रामीण भागात आजही विज्ञान तंत्रज्ञानाचा मूलभूत विस्तार झालेला नाही. ग्रामीणच नाही तर शहरातही अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा सुद्धा नाही. केंद्र सरकारने शाळांमध्ये प्रयोगशाळा नसली तरी, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात मायक्रोस्कोप पोहचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मायक्रोस्कोपचे मिनी मॉडेल तयार केले आहे. याला फोल्डस्कोप असे नाव दिले आहे. केंद्र शासनाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या माध्यमातून फोल्डस्कोप फेस -१ या अभियानातून याचा प्रचार आणि प्रसार देशभरात ५१२ प्रिंन्सीपल इन्व्हेस्टीगेटरकडून होत आहे.

Each student will be in the hand 'Foldscope' | प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात असेल ‘फोल्डस्कोप’

प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात असेल ‘फोल्डस्कोप’

Next
ठळक मुद्देकेंद्र शासनातर्फे प्रचार प्रसारासाठी देशभरात ५१२ प्रिन्सीपल इन्व्हेस्टीगेटर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला असला तरी, ग्रामीण भागात आजही विज्ञान तंत्रज्ञानाचा मूलभूत विस्तार झालेला नाही. ग्रामीणच नाही तर शहरातही अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा सुद्धा नाही. केंद्र सरकारने शाळांमध्ये प्रयोगशाळा नसली तरी, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात मायक्रोस्कोप पोहचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मायक्रोस्कोपचे मिनी मॉडेल तयार केले आहे. याला फोल्डस्कोप असे नाव दिले आहे. केंद्र शासनाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या माध्यमातून फोल्डस्कोप फेस -१ या अभियानातून याचा प्रचार आणि प्रसार देशभरात ५१२ प्रिंन्सीपल इन्व्हेस्टीगेटरकडून होत आहे.
नागपूर महापालिकेद्वारे आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्यात फोल्डस्कोपच्या प्रचारासाठी आलेल्या डॉ. अनुपमा हर्षल या उत्तरपूर्व भागातील प्रिन्सीपल इन्व्हेस्टीगेटर आहेत. त्या दुर्गम भागात, खेड्यापाड्यात फोल्डस्कोपचा प्रचार करीत आहे. फोल्डस्कोप हे एक मिनी मायक्रोस्कोप आहे. मूळचे भारतीय असलेले डॉ. मनुप्रकाश स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत डॉ. मनुप्रकाश यांची भेट घेतली. तेव्हा डॉ. मनुप्रकाश यांनी मोदींना त्यांचे पेटेंट असलेले फोल्डस्कोप भेट दिले. सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त अशा उपकरणाचा विस्तार जगभर करण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन, कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. डॉ. अनुपमा हर्षल या फोल्डस्कोपच्या प्रचार आणि प्रसारासाठी झटत आहे. महापालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या बाबतीत संशोधन वृत्ती वाढावी यासाठी कार्यशाळा, शिबिर, मेळावे घेत आहेत. मनपाच्या अपूर्व विज्ञान मेळाव्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी या मिनी फोल्डस्कोपची माहिती घेऊन या छोट्या उपकरणाची उपयुक्तता जाणून घेतली.

फोल्डस्कोपची विशेषत:
१ मायक्रॉनपेक्षा छोटे जीव बघता येतात
त्याचे फोटोसुद्धा घेता येतात. फोटो व्हीडीओ सुद्धा अपलोड करता येतात
दह्यातील बॅक्टेरीया, बुरशी, पानांतील सछिद्र भाग बघता येतो.
प्रत्येक फोल्डस्कोपचा स्वतंत्र युनिक कोड आहे.
फोल्डस्कोपमुळे सूक्ष्मजीव शास्त्राचे अध्ययन करता येते.
फोल्डस्कोपमुळे विद्यार्थी आपल्या घरातही प्रयोग करू शकतात.

सरकारने दिलेले हे वरदान आहे
दुर्गम भागातील संशोधन वृत्ती बाळगणारे विद्यार्थी किंवा विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, फोल्डस्कोप हे वरदान आहे. अगदी स्कूलबॅगमध्ये पर्समध्ये सहज हाताळता येणारे असल्याने विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीला चालना मिळणार आहे. शिक्षण विभागाने याला प्रोत्साहन दिल्यास, भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात ‘फोल्डस्कोप’ दिसेल.
डॉ. अनुपमा हर्षल, प्रिन्सीपल इन्व्हेस्टीगेटर

Web Title: Each student will be in the hand 'Foldscope'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.