भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 05:06 IST2024-12-05T05:06:24+5:302024-12-05T05:06:37+5:30
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या केंद्रामुळे या दोन्ही राज्यांतील काही जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले.

भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
नागपूर : विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी ७:२७च्या सुमारास भूकंप झाल्यासारखे जाेरदार हादरे बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार याचे केंद्र शहरापासून ३०० कि.मी. दूर तेलंगणाच्या मुलुगू येथे हाेते. या भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल होती.
शहरात सिव्हिल लाइन्ससह जरीपटका, जाफरनगर, मानकापूर या भागांत नागरिकांना हादरे बसले. कामठीतही धक्के जाणवले; गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी तालुक्यांतील काही भागांत भांडी पडल्याचे नागरिकांनी सांगितले. चंद्रपूरच्या ७ तालुक्यांत भूकंपाचे धक्के जाणवले.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या केंद्रामुळे या दोन्ही राज्यांतील काही जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले.