पाच वर्षात देशात १३८ ठिकाणी भूकंप लहरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:41 PM2020-06-25T23:41:05+5:302020-06-25T23:43:20+5:30

२०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

Earthquakes in 138 places in the country in five years | पाच वर्षात देशात १३८ ठिकाणी भूकंप लहरी

पाच वर्षात देशात १३८ ठिकाणी भूकंप लहरी

Next
ठळक मुद्देनेपाळ वगळता कुठेही जीवित व वित्तहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. सुदैवाने यातील कोणत्याच ठिकाणी जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नाही.
भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती भयावह चित्र निर्माण करणारी असते. भूगर्भातील हालचाली तशा नियमित घडणाऱ्या आहेत मात्र एखाद्या वेळी तीव्र स्वरूप धारण केले तर त्याचे भयकारी परिणाम मानव आणि सजीवांना सोसावे लागतात. १९९३ साली महाराष्ट्राच्या किल्लारी येथे आणि २००१ मध्ये गुजरातच्या भुज परिसरातील कटू आठवणी अजूनही ताज्या आहेत. किल्लारीत १०,००० तर भुजमध्ये २२००० नागरिकांचे बळी गेले तर लाखो लोक बेघर झाले. प्राण्यांचे मृत्यू तसेच आर्थिक व नैसर्गिक हानी झाली ती वेगळी. सुदैवाने त्यानंतर कुठलाही भूकंप हानिकारक ठरला नाही. मात्र २००४ साली सुमात्रा बेटावर आलेल्या भूकंपामुळे हिंदी महासागरात सुनामी निर्माण झाली आणि त्याचे मोठे परिणाम तटावरील नागरिकांनी भोगावे लागले. २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे या देशात जीवित आणि वित्त हानी झाली.
आपल्या देशात हिमालय आणि पूर्वोत्तर राज्ये हे भूकंपाचे संवेदनशील पट्टे म्हणून ओळखले जातात. याशिवाय गुजरातचे कच्छ आणि भुज या प्रदेशाचा कमी संवेदनशील भागात समावेश होतो. जीएसआयच्या अहवालानुसार २०१५ पासून पाच वर्षात १३८ मोठ्या भूकंपाच्या नोंदी झाल्या. याशिवाय ४ पेक्षा कमी तीव्रता असलेल्या भूकंप लहरींही घडल्या पण तीव्रता परिणामकारक नव्हती. यातील बहुतेक हिमालय आणि पूर्वोत्तर राज्यातील आहेत. १३८ पैकी काहींची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये ६ ते ७ च्या जवळपास होती. ही तीव्रता तशी धोकादायक मानली जाते. पूर्वोत्तर राज्यात भूकंपाबाबत जागृती असल्याने त्याचे परिणाम जाणवले नसल्याचे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Earthquakes in 138 places in the country in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.