सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 11:31 AM2022-05-13T11:31:07+5:302022-05-13T11:50:36+5:30

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे

Earth's temperature has recently risen as the atmosphere below the troposphere warms | सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत

सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत

googlenewsNext
ठळक मुद्देपृथ्वीचे ट्रोपोस्फियर तापमानवाढ धोकादायक : भविष्यात उष्णलहरींचा धोका

नागपूर : एका आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संशोधनातून धोकादायक बाब पुढे आली आहे. प्रदूषण आणि हरित वायूंमुळे पृथ्वीचे ट्रोपोस्फियर (अंतरावरण) गरम झाले आहे. मागील ४० वर्षात या अंतरावरणाची उंची आणि सीमा २०० मीटरने वाढली आहे. परिणामत: भविष्यात अनेक नैसर्गिक समस्या निर्माण होणार असून उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा यावर विपरित परिणाम होण्याचा इशारा या संशोधनातून देण्यात आला आहे.

नानजिंग विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संशोधक लिग्युन मेंग, तसेच कॅनडा, ऑस्ट्रिया येथील संशोधक जेन लिऊ, डेव्हिड तारासिक, विल्यम रेनेडेल, आद्रिया स्टेनर, हेलेंजर विल्हेम्सेन, ली वेंग यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. १९८० ते २०२० या ४० वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात झालेल्या बदलांचा अभ्यास यात करण्यात आला आहे. उत्तर गोलार्धातील भूप्रदेश आणि २० ते ८० अक्षांशावरील हवामान क्षेत्रावर हे अध्ययन करण्यात आले होते.

या संशोधकांच्या निरीक्षणानुसार, १९६० पूर्वी पृथ्वीचे आवरण स्थिर होते. पृथ्वीवर मानवनिर्मित हरितवायू तयार होत गेले. ते थरात साचले. यामुळे पृथ्वीच्या ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेले. २००० पासून या आवरणाचे तापमान ८० टक्क्यांनी वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे प्रदूषण आणि हरित वायूंमुळे ट्रोपोस्फियर वेगाने पुढे सरकत आहे. त्याचा वेग प्रतिदशक ५० ते ६० मीटर असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. ही उंची आजपर्यंत २०० मीटरने वाढली आहे.

वाढलेले तापमान यामुळेच !

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. या गरमीमुळे भविष्यात मुसळधार पाऊस, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल. वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता प्रभावित होईल, हवामान आणि ऋतूंवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याचा धोका आहे.

जागतिक प्रयत्नांमुळे २०० पासून ओझोनचा थर भरून निघत आहे, त्या धर्तीवर वायू प्रदूषण थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले गेले तर निश्चितपणे ट्रोपोस्फियरचे गरम होणे हळूहळू थांबेल. सरकारनेही यात लक्ष घालण्याची गरज आहे.

- सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी

 

Web Title: Earth's temperature has recently risen as the atmosphere below the troposphere warms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.