नवेगाव खैरी येथे गांडूळ खत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:09 AM2021-03-01T04:09:55+5:302021-03-01T04:09:55+5:30
पारशिवनी : रामटेक येथील आकाशझेप फाऊंडेशनच्या वतीने आम्ही भारतीय व निसर्ग मित्र मंडळ उपक्रम राबविले जात असून, या उपक्रमांतर्गत ...
पारशिवनी : रामटेक येथील आकाशझेप फाऊंडेशनच्या वतीने आम्ही भारतीय व निसर्ग मित्र मंडळ उपक्रम राबविले जात असून, या उपक्रमांतर्गत पारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील प्रकाश राऊत यांच्या शेतात गांडूळ खत कार्यशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते.
या कार्यशाळेत शेतकऱ्यांना गांडूळ खताचे महत्त्व व उपयाेगिता पटवून देण्यात आली. शिवाय, शेणखत, पालापाचाेळा व इतर बाबींचा वापर करून गांडूळ खत तयार करण्याची पद्धतही प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली. याप्रसंगी आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे, प्रकाश राऊत, आकाशझेपचे अभय चकबैस, प्रशांत आपुरकर, नीरज राऊत, संकेत पाटील, करण भलावी, समीर गेडाम, शुभम साहारे, लोकेश ढोरे, शिवम राऊत, दीक्षा चक्रवर्ती, भाविका डायरे, ईशा भुजाडे, साक्षी बर्वे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.