‘एमआरओ’चे ‘ईएएसए सर्टिफिकेशन’ लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:34 AM2020-06-25T10:34:40+5:302020-06-25T10:35:08+5:30

नागपुरात एअर इंडियाच्या ‘एमआरओ’ला ‘युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)’ हवे असलेले सर्टिफिकेशनचे काम टाळेबंदीमुळे लटकले आहे.

‘EASA Certification’ of ‘MRO’ is on hold | ‘एमआरओ’चे ‘ईएएसए सर्टिफिकेशन’ लटकले

‘एमआरओ’चे ‘ईएएसए सर्टिफिकेशन’ लटकले

googlenewsNext
ठळक मुद्देमहाद्विपीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे

वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात एअर इंडियाच्या ‘एमआरओ’ला ‘युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)’ हवे असलेले सर्टिफिकेशनचे काम टाळेबंदीमुळे लटकले आहे. हे प्रमाणपत्र व्यापारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, याच आधारावर मिहान स्थित एमआरओचा व्यापार अन्य महाद्विपांपर्यंत विस्तारित होऊ शकते.

‘ईएएसए सर्टिफिकेशन’साठी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएलएल)ने गेल्या वर्षाच्या अखेरीस आवेदन केले होते. त्यानंतर २०२० मध्ये बेल्जियम येथून आलेल्या ईएएसएच्या टीमने एमआरओचे आॅडिट केले होते. मात्र, याच काळात कोविड-१९चा प्रादुर्भाव सुरू झाला आणि टाळेबंदीमुळे ही प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. हे सर्टिफिकेशन मिळाल्यावर आशिया खंडातील अनेक देशांचे बोर्इंग ७७७ व ७३७ आणि एअरबस ३२० विमान नागपूरच्या एमआरओमध्ये दुरुस्तीसाठी आणले जाऊ शकतात. ईएएसए सर्टिफिकेशन असलेल्या एमआरओमध्येच आपले विमान देखदेखीकरिता जावे, असेही विमाने बनविणाऱ्या कंपनीला वाटते.

शिवाय, देशातील विविध एअरलाईन्सच्या बेड्यात बहुतांश विमाने याच युरोपियन एअरबस कंपनीची आहेत. हे सर्टिफिकेशन प्राप्त झाल्यास मेजर चेक्ससाठी एअरबसच्या विमानांना देशाच्या बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. वर्तमानात शेजारच्या श्रीलंकेकडे ईएएसए सर्टिफिकेशन आहे. त्यामुळेच, भारतातून अनेक एअरक्राफ्ट उच्चस्तरीय देखरेखीकरिता श्रीलंकेत पाठविण्यात येत असतात. सद्य:स्थितीत एमआरओकडे फेडरल एव्हिएशन एजन्सी (एफएए)चे सर्टिफिकेशन आहे.

देशात केंद्रीय व्यवस्था असल्यामुळे ईएएसए सर्टिफिकेशन प्राप्त झाल्यावर कतर एअरवेज, एतिहाद सह अन्य खाडी देशांतील विमान कंपन्या आपली विमाने नागपुरातच देखरेखीकरिता पाठवू शकतात. नागपुरात रनवे बहुतांश वेळेस रिकामे असते आणि एमआरओमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित व्यवस्था असल्यानेच, हे सर्टिफिकेशन प्राप्त झाले तर या विमानन कंपन्यांना त्याचा लाभ मिळू शकतो.

Web Title: ‘EASA Certification’ of ‘MRO’ is on hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.