ईटनकर, साखळे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:46 PM2018-09-03T23:46:10+5:302018-09-03T23:48:59+5:30

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रकाश ईटनकर व प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.चंद्रशेखर साखळे यांची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

Eatankar, Sakhle declared excellent teacher award | ईटनकर, साखळे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

ईटनकर, साखळे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

Next
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : उत्कृष्ट संशोधक व लेखकांचादेखील होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रकाश ईटनकर व प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.चंद्रशेखर साखळे यांची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
नागपूर विद्यापीठात दरवर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा यात उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक व उत्कृष्ट लेखक या पुरस्कारांचा समावेश आहे. कमला नेहरू महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.वासुदेव गुरनुले यांना उत्कृष्ट संशोधक तर सी.पी.अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांना उत्कृष्ट लेखक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर हे उपस्थित राहतील. शिक्षण कल्याण निधी अंतर्गत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

यंदा घटली पुरस्कार विजेत्यांची संख्या
दरवर्षी तीन किंवा अधिक प्राध्यापकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मात्र यंदा विद्यापीठाने केवळ दोनच शिक्षकांना हा पुरस्कार घोषित केला आहे. दर्जेदार कार्य करणाऱ्यांनाच पुरस्कार प्रदान करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतली असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

Web Title: Eatankar, Sakhle declared excellent teacher award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.