‘एमकॉम’ परीक्षेला चुकांचे ‘ग्रहण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:48 PM2018-04-13T14:48:04+5:302018-04-13T14:48:19+5:30

गेल्या काही सत्रांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सुरळीत चालू असताना यंदा मात्र काही त्रुटी दिसून येत आहेत. ‘बीकॉम’च्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच ‘एमकॉम’च्या परीक्षेलादेखील ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. ५ एप्रिल रोजी ‘एमकॉम’ द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांना चुकीचा प्रश्न सोडवावा लागला, तर ९ एप्रिल रोजी जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

'Eclipse' for mistakes in 'M.com' Examination | ‘एमकॉम’ परीक्षेला चुकांचे ‘ग्रहण’

‘एमकॉम’ परीक्षेला चुकांचे ‘ग्रहण’

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : कधी चुकीचा पेपर तर कधी चुकीचा प्रश्न

योगेश पांडे / आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही सत्रांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सुरळीत चालू असताना यंदा मात्र काही त्रुटी दिसून येत आहेत. ‘बीकॉम’च्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच ‘एमकॉम’च्या परीक्षेलादेखील ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. ५ एप्रिल रोजी ‘एमकॉम’ द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांना चुकीचा प्रश्न सोडवावा लागला, तर ९ एप्रिल रोजी जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
५ एप्रिल रोजी ‘एमकॉम’ द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांचा (सीबीसीएस प्रणाली) ‘अ‍ॅडव्हान्स कॉस्ट अकाऊन्टिंग’ हा पेपर होता. या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक ३ (क) मध्ये विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार गणित सोडविणे अशक्यच होते.

लाखांऐवजी हजारामध्ये आकडे देण्यात आले होते. ‘एसएफएस’ महाविद्यालयातील केंद्रावर विद्यार्थ्यांनी केंद्रप्रमुखांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. केंद्रप्रमुखांनी विद्यापीठाशी संपर्क केला असता प्रश्न बरोबर असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात मात्र विद्यार्थ्यांना दुसरी आकडेवारी गृहित धरण्याबाबत सांगण्यात आले. त्यामुळे आता १६ गुणांच्या प्रश्नांचे गुण जातात की काय, अशी विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे.
‘सीबीसीएस’ऐवजी ‘सीबीएस’चा पेपर
४दरम्यान, ९ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता ‘एमकॉम’ द्वितीय सत्राचा ‘ह्मुमन रिसोर्स मॅनेजमेन्ट’ हा पेपर होता. ‘एसएफएस’ महाविद्यालय तसेच अण्णासाहेब गुंडेवार या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ‘सीबीसीएस’ऐवजी (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) ‘सीबीएस’चा (क्रेडिट बेस्ड सेमिस्टर) पेपर देण्यात आला. पेपर हाती आल्यानंतर यातील त्यांच्या प्रणालीपेक्षा पूर्णत: वेगळा होता. गुणांची पद्धतदेखील वेगळी होती. यासंदर्भात पर्यवेक्षकांना विद्यार्थ्यांनी तातडीने माहिती दिली. विद्यापीठाला त्यानंतर संपर्क साधला असता अगोदर सर्व काही ठीक असल्याचे उत्तर देण्यात आले. परंतु त्यानंतर चूक लक्षात आली व योग्य पेपर पाठविण्यात आला. यात सुमारे दीड तासांचा वेळ निघून गेला. ‘एसएफएस’ महाविद्यालयात तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत परीक्षा चालली व त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तर एका केंद्रावर तर विद्यार्थ्यांनी ‘सीबीएस’चाच पेपर सोडविल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 

Web Title: 'Eclipse' for mistakes in 'M.com' Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.