इको फ्रेण्डली गणेशा मेकिंग वर्कशॉप आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:42+5:302021-09-06T04:11:42+5:30
- लोकमत कॅम्पस क्लब व एम.एच.जे. विद्यानिकेतनचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबच्यावतीने ‘इको फ्रेण्डली ...
- लोकमत कॅम्पस क्लब व एम.एच.जे. विद्यानिकेतनचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबच्यावतीने ‘इको फ्रेण्डली गणेशा मेकिंग वर्कशॉप’चे आयोजन सोमवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ४ वाजताच्या दरम्यान मेजर हेमंत जकाते (एम.एच.जे.) विद्यानिकेतन ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, म्हाळगीनगर चौक, रिंगरोड, नागपूर येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बेसिक ते संपूर्ण गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण ऐश्वर्या हॉबी क्लासेस ॲण्ड आर्ट गॅलरीच्या जया गुप्ता देणार आहेत. कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी ३ किलो शाडू माजी भिजवून आणायची आहे. सोबत वॉटर बॉटल, दोन ते तिन पेंट ब्रश, ३ पॅकेट टूथ पिक, मीडियम साईज प्लास्टिक पॉलिथिन, माती भिजवण्यासाठी छोटा टब, चाकू, टुल किट, वूड बेस (लाकडी सिंहासन) आणणे गरजेचे आहे. या कार्यशाळेत फक्त पहिल्या ५० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश घेण्यासाठी ९८२२४०६५६२ किंवा ९८८१७४९३९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, वर्धा रोड, नागपूर येथे संपर्क साधता येईल.
...............