पोलीस बांधवांना पर्यावरणपूरक बीज राखीचे बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:14+5:302021-08-27T04:13:14+5:30
बीज राखी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाएनजीओ फेडरेशन पुणे, आशा फाउंडेशन व आधार समाज कल्याण मानवहितकारी संघटनेच्या संयुक्त ...
बीज राखी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाएनजीओ फेडरेशन पुणे, आशा फाउंडेशन व आधार समाज कल्याण मानवहितकारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बीज राखी कुंडीत किंवा अंगणात रुजवावी आणि त्यापासून उगविणाऱ्या रोपांच्या स्वरूपात बहिणीची आठवण भावाच्या मनात कायमस्वरूपी राहावी हा या उपक्रमाचा उद्देश होता. या राखीमध्ये लिंबू, चिंच, आवळा, मका, बरबटी, पळस, मगज, करंजी, चणा, गहू आदी बियांपासून ॉराखी बनविण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कुथे, महाएनजीओ फेडरेशनचे संचालक प्रतिमा पटले, ऊर्मिला लाकडे, अपर्णा फुलझेले, शीतल सोनवणे, मेघा उरकुडे, ॲड. मंगला बोरिकर, नलिनी तोडासे, विक्की कनोजे, सुनील लाकडे, भक्ती लाकडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, पोलीस कर्मचारी हरीश बगडे, ध्रुव पांडे, संतोष येलुरे, अनिल झाडे, दिलीप ठाकरे, भारती मेसरे, संजू गायकवाड, उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज झाडे उपस्थित होते.