देशाची अर्थव्यवस्था पोखरणारा तेलगी पुन्हा चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:36 AM2017-10-25T01:36:32+5:302017-10-25T01:36:43+5:30

हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी सध्या कर्नाटकमधील बंगळुरू येथील व्हिक्टोरिया इस्पितळात शेवटच्या घटका मोजत आहे.

The economy of the country revolves around Telgi again | देशाची अर्थव्यवस्था पोखरणारा तेलगी पुन्हा चर्चेत

देशाची अर्थव्यवस्था पोखरणारा तेलगी पुन्हा चर्चेत

Next
ठळक मुद्देबनावट मुद्रांक घोटाळा : २१ हजारांच्या तिकिटे ते हजारो कोटींचे मुद्रांक

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी सध्या कर्नाटकमधील बंगळुरू येथील व्हिक्टोरिया इस्पितळात शेवटच्या घटका मोजत आहे. त्याची स्थिती चिंताजनक असल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यामुळे विस्मृतीत गेलेला बनावट ेमुद्रांक घोटाळा पुन्हा एकदा देशभर चर्चेला आला आहे.
हा घोटाळा उघड करण्यात ज्यांनी मैलाचा दगड ठेवला ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख सध्या नागपुरातील गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. देशभर खळबळ उडवून देणाºया या प्रकरणाचा धागा त्यांना कसा गवसला अन् त्या एका धाग्याने बड्याबड्यांना खिशात ठेवणारा अब्दुल करीम तेलगी कसा कारागृहात पोहचला त्याची ‘अनटोल्ड स्टोरी’ त्यांनी लोकमतला सांगितली.
ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष शाखेत वजीर शेख पोलीस उपनिरीक्षक म्हणून १९९९ ला कार्यरत होते. ठाणे-मुंबई परिसरात एका टोळीकडून पोस्टाची बनावट तिकिटे विकली जात असल्याची माहिती त्यांच्या खबºयाने त्यांना पुरविली होती. त्यावरून शेख यांनी तब्बल १५ दिवस वेषांतर करून या टोळीची पुराव्यासहित माहिती मिळविली. ही टोळी कुणाकडून पोस्टाची तिकिटे आणतात अन् कुणाला अर्ध्या किमतीत विकतात, त्याची पक्की माहिती मिळविल्यानंतर बनावट तिकिटांची मोठी खेप घेऊन येणाºया आरोपीला पकडण्यासाठी २१ आॅगस्ट १९९९ ला कारवाईची तयारी केली. वरिष्ठांकडून घेतलेल्या परवानगीनंतर वजीर शेख यांनी त्यांचे मीरारोड पोलीस चौकीत उपनिरीक्षक असलेल्या प्रताप काकडेंना याबद्दल सांगितले. तेथील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ पाटील यांना ही माहिती दिल्यानंतर शेख आणि काकडेंनी आपल्या
कॅश रिवॉर्डसह शाबासकीची थाप
कोर्टाने या प्रकरणाचा निकाल सुनावताना तेलगीला ३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्याला बंगळुरूच्या पाराप्पाना अग्रहारा कारागृहात डांबण्यात आले. मधुमेह, उच्च रक्तदाब, एड्ससह अनेक गंभीर व्याधींनी ग्रस्त असलेल्या तेलगीची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे सध्या तो व्हिक्टोरिया इस्पितळात शेवटच्या घटका मोजत असल्याचे वृत्त पसरले असून, त्यामुळेच या बहुचर्चित घोटाळ्याचा तपास पोलीस दलात चर्चेला आली आहे.
तपासाची महत्त्वपूर्ण कडी असलेल्या वजीर शेख यांना तत्कालीन पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी अडीच हजार रुपयांचा कॅश रिवॉर्ड देऊनही गौरविले होते.

Web Title: The economy of the country revolves around Telgi again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.