आरटीओ खरमाटेवर ईडी चौकशी! नागपुरात नव्हे तर पुण्यात छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 07:54 PM2021-08-30T19:54:16+5:302021-08-30T19:55:01+5:30

Nagpur News राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर सोमवारी नागपूर ग्रामीण आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या नागपुरातील घरावर व कार्यालयावर ईडीचे छापे पडल्याचा चर्चेला उधाण आले; परंतु सायंकाळपर्यंत अशी कुठलीच कारवाई झालेली नव्हती.

ED inquiry on RTO Kharmate! Not in Nagpur but in Pune | आरटीओ खरमाटेवर ईडी चौकशी! नागपुरात नव्हे तर पुण्यात छापे

आरटीओ खरमाटेवर ईडी चौकशी! नागपुरात नव्हे तर पुण्यात छापे

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकृतपणे बोलण्यास कोणी तयार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर सोमवारी नागपूर ग्रामीण आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या नागपुरातील घरावर व कार्यालयावर ईडीचे छापे पडल्याचा चर्चेला उधाण आले; परंतु सायंकाळपर्यंत अशी कुठलीच कारवाई झालेली नव्हती. त्यांच्या पुण्याच्या घरावर कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. (ED inquiry on RTO Kharmate! Not in Nagpur but in Pune)

मनिलाँर्डिंगप्रकरणी ईडीने परिवहनमंत्री परब यांना नोटीस बजावली आहे. त्यात त्यांना येत्या ३१ ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. परब यांना नोटीस आल्यानंतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर सोमवारी ईडीने छापेमोरी केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

यामुळे अनेक प्रसार माध्यमांनी सोमवारी कामठी रोडवरील दुपारी ग्रामीण आरटीओ कार्यालय गाठले, तर काहींनी रामनगर येथील घरीही जाऊन आले; परंतु कुठेच कारवाई झाली नाही. पुण्याच्या घरावर छापे पडल्याची माहिती पुढे येते असली तरी याबाबत अधिकृतपणे कोणी बोलण्यास तयार नाही.

Web Title: ED inquiry on RTO Kharmate! Not in Nagpur but in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.