नागपुरात बिल्डरच्या कार्यालय व घरावर ‘ईडी’चे छापे; शहरातील उद्योजकांमध्ये खळबळ

By योगेश पांडे | Published: March 3, 2023 01:09 PM2023-03-03T13:09:22+5:302023-03-03T13:12:34+5:30

नागपुरात संदेश ग्रुपवर ईडीची कारवाई

ED raids on R. Sandesh Group office and director's house in Nagpur | नागपुरात बिल्डरच्या कार्यालय व घरावर ‘ईडी’चे छापे; शहरातील उद्योजकांमध्ये खळबळ

नागपुरात बिल्डरच्या कार्यालय व घरावर ‘ईडी’चे छापे; शहरातील उद्योजकांमध्ये खळबळ

googlenewsNext

नागपूर : नागपुरातील आर. संदेश ग्रुपच्या कार्यालय तसेच संचालकाच्या घरावर ‘ईडी’कडून शुक्रवारी सकाळी छापे टाकण्यात आले. संचालक रामदेव अग्रवाल यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी ‘ईडी’चे पथक विविध दस्तावेजांची तपासणी करत होते. या छाप्यांमुळे शहरातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी सकाळी रामदासपेठेतील गौरी हाईट्स या इमारतीतील वरच्या मजल्यांवरील अग्रवाल यांच्या निवासस्थानी ‘ईडी’चे पथक पोहोचले. सकाळी आठच्या अगोदरच पथकाने छापे टाकले व दुपारी बारा वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. यासोबतच संदेश ग्रुपच्या विविध कार्यालयांवरदेखील छापे टाकण्यात आले. आग्रवाल यांचे बांधकाम आणि औषध क्षेत्रात काम आहे. नागपूरातील काही जमिन व्यवहारांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत कुठलीही माहिती देण्यास नकार दिला.
 

Web Title: ED raids on R. Sandesh Group office and director's house in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.