घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या नेत्यांवर ईडीचा ‘वॉच’; कडक कारवाईच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 08:00 AM2022-06-29T08:00:00+5:302022-06-29T08:00:07+5:30

Nagpur News राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) उडीमुळे उद्धव सरकारच्या बाजूने उभ्या राहिलेल्या अनेक नेत्यांना कारवाईची भीती वाटत आहे.

ED's 'watch' on leaders involved in scams; Strict action instructions | घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या नेत्यांवर ईडीचा ‘वॉच’; कडक कारवाईच्या सूचना

घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या नेत्यांवर ईडीचा ‘वॉच’; कडक कारवाईच्या सूचना

Next
ठळक मुद्देपोलिसांत दाखल गुन्ह्यांचा अभ्यास

जगदीश जोशी

नागपूर : राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) उडीमुळे उद्धव सरकारच्या बाजूने उभ्या राहिलेल्या अनेक नेत्यांना कारवाईची भीती वाटत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशिवाय अनेक नेते किंवा आमदारांशी संबंधित प्रकरणांची ईडीकडून दीर्घकाळापासून चौकशी सुरू होती. काही कारणास्तव त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आता या प्रकरणांची नव्याने चौकशी केली जात आहे.

मागील आठवड्यापासून राज्य सरकार संकटात सापडले आहे. संजय राऊत यांच्याशी संबंधित १०३४ कोटी रुपयांचा पत्रा चाळ जमीन घोटाळा ईडीसाठी जुना आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण राऊतच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे चार महिन्यांपूर्वी तपासादरम्यान ईडीला समजले. राऊत कुटुंबीयांच्या परदेश प्रवासाचा खर्चही प्रवीण राऊत यांच्या कंपनीने उचलला आहे. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची २ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. या घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण राऊत याला ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्याशिवाय काही बडे नेते आणि आमदारांशी संबंधित प्रकरणे ईडीकडे प्रलंबित आहेत. काही नेते किंवा आमदारांवर फसवणूक आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हेही दाखल आहेत. अशा प्रकरणांमध्ये, ईडीला घोटाळ्याचे प्राथमिक पुरावे मिळाले आहेत. दहा महिन्यांपूर्वी ईडीने एका कॅबिनेट मंत्र्यावर गुन्हा दाखल केला होता. हे मंत्रीही कथित पत्नीच्या संदर्भात चर्चेत आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राव्यतिरिक्त विदर्भातील अनेक नेते आणि आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका तगड्या नेत्यावरील मोठा खटला वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. आणखी एक नेताही अनेक दिवसांपासून रडारवर आहे.

Web Title: ED's 'watch' on leaders involved in scams; Strict action instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.